Pune News

Pune News : पुण्यामध्ये टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

20450 0

पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये (Pune News) अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव ढमढेरे परिसरातील तोडकरवस्ती या ठिकाणी हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
या अपघातात कारमधील कविता बोरुडे (40), योगिता बोरुडे (40) आणि कारचालक राजू शिंदे (25, तिघेही रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील किशोरी बोरुडे (17) ही मुलगी तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे आणि श्रीराम बापूराव मांडे असे तिघेजण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर असणाऱ्या तोडकर वस्ती येथे वेगात असलेले टेम्पो आणि कार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तीन जन गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Breaking इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू

Posted by - April 2, 2022 0
पुणे- वाल्हेकरवाडी रस्त्यावर एका इमारतीचा काही भाग कोसळून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज…

पुणे, पिंपरी-चिंचवड सहित ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित, सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु होण्याची शक्यता

Posted by - February 9, 2022 0
पुणे- महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये आज, बुधवारी पहाटे…
Crime

रक्षकच बनला भक्षक ! औरंगाबादेत चक्क पोलीस कर्मच्याऱ्यानंच लुटलं व्यापाऱ्याला…

Posted by - September 16, 2022 0
औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना घडलीये. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यानं सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आलाय. संतोष…

Big Breaking : निरा नदीत सापडला पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह ; वाचा सविस्तर

Posted by - October 14, 2022 0
सातारा : राज्य सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदी पात्रात सापडून आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *