‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते – मुकुंद किर्दत

349 0

सासवड- पुरंदर तालुक्याने एकेकाळी जनता दल सारखा पर्याय सहज स्वीकारला होता, त्यामुळे ‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते असा विश्वास आपचे
जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला.

सासवड येथे झालेल्या ‘आप’च्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी सासवड आणि जेजुरी भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किर्दत म्हणाले, ” महाविकासचे आघाडीचे नेते एकमेकांना गद्दार ठरवण्यात मग्न असून एकमेकावर चिखलफेक करीत आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणघेणे उरलेले नाही. आप हा जनतेचा आवाज आहे व काम की राजनीती करणारा एक वेगाने वाढणारा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची ओळख आता झाली आहे. महाविकास आघाडीमुळे पुरंदर तालुक्यासाठी आवाज उठवणारा विरोधी पक्ष उरला नाही. ज्यांच्या हातात सत्ता आली त्यांनी विमानतळ, राष्ट्रीय बाझार, गुंजवणी प्रकल्प यातले काहीच पुढे नेले नाही. पुरंदर तालुक्याने एकेकाळी जनता दल सारखा पर्याय सहज स्वीकारला होता, त्यामुळे आपचे बीज पुरंदर मध्ये उत्तम रूजू शकते” असे किर्दत म्हणाले.

‘आप’चे स्थानिक समन्वयक गणेश चौधरी म्हणाले की, दिल्लीनंतर पंजाब मधील विजयामुळे सामान्य जनतेच्या आशा जागृत झाल्या आहेत.

दत्तात्रय कड म्हणाले, स्थानिक पातळीवर पक्ष कार्यकर्ता मोहीम राबवण्यात येणार असून गावातही संपर्क मोहीम राबवण्यात येणार असल्याचे समन्वयक दत्तात्रय कड यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील इतर पक्षांतील दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते आपच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.

Share This News

Related Post

Uddhav Thackeray

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे…

मोठी बातमी : परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्या दरम्यान गोंधळ

Posted by - December 13, 2022 0
परभणी : आज पुण्यामध्ये बंद पळून मूक मोर्चा काढण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी…

बालगंधर्व रंगमंदिराच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Posted by - June 21, 2024 0
पुणे :  पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला यंदा ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. बालगंधर्व रंगमंदिरांच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या…
Rangari Ganpati

Pune News : संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला केली मोगर्‍यांची आरास

Posted by - May 27, 2024 0
पुणे : संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला (Pune News) वासंतिक उटी व मोगरा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.…

#PUNE : खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण

Posted by - March 22, 2023 0
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधी मधून श्री कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *