पुणे : महागाईच्या राक्षसाच्या विरोधात आम आदमी पार्टीने काढली गॅस सिलेंडरची आणि विजेची अंत्ययात्रा

260 0

पुणे : महागाईच्या राक्षसाच्या विरोधात ‘आप’ पुणे कडून बुधवारी गॅस सिलेंडरची व विजेची अंत्ययात्रा काढण्यात आली.सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आले.

                                           मागील काही वर्षातील वाढत्या महागाईचे अक्राळ-विक्राळ रूप बघून सर्वसामान्य जनता आज हवालदिल झाली आहे. “बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार” हे ब्रीदवाक्य घेऊन २०१४ साली सत्तेवर आलेले मोदी सरकार गेल्या ८ वर्षांत विकासाच्या गाडीला ब्रेक लावून महागाईची एक्सप्रेस मात्र सुसाट वेगाने पळवत आहे.                                                                                                                                    या बेभान सुटलेल्या महागाईच्या राक्षसाचा निषेध म्हणून आम आदमी पार्टी (आप) ने सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून या प्रचंड भाववाढीचा कडाडून विरोध केला आजच्या अंत्ययात्रा द्वारे. ही गॅस सिलिंडर व विजेची अंत्ययात्रा मोलेदिना रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते, संविधानिक पद्धतीने व सर्व नियमांचे पालनकरित, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली. या यात्रेत महागाई व भ्रष्टाचाराचा राक्षस, यम यांच्यासोबत ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आप महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी सांगितले की, “गेल्या वर्षभरात सर्वसामान्य व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील प्रत्येक वस्तूचे भाव आज आकाशाला भिडले आहेत. घरघुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीने रु. १००० चा टप्पा ओलांडला आहे. वर्षभरात सिलेंडर दरात तब्बल रु. २५० पेक्षा अधिक दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर तर सातत्याने वाढविण्यात येत आहेत. क्वचितच अपवाद म्हणून २० रुपयांनी वाढवलेले दर तोंडदेखले म्हणून ५-१० रुपयांनी कमी केले जातात, हे जनतेला समजत नाही असे भाजपाच्या केंद्र सरकारने समजू नये.”                                                                                                                                                  आधीच गॅस सिलिंडर व इंधन दर वाढीने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले होते. आतातर, महाराष्ट्रात होवू घातलेल्या वीज दरवाढीच्या ‘शाॅक’ने आणि केंद्र सरकारच्या नवीन जी.एस.टी. धोरणानुसार जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या कराने, महागाईच्या या आगीत पेट्रोल ओतले गेले आहे. आप पुणे या विध्वंसक महागाईचा, आजच्या या आंदोलनाद्वारे, तीव्र निषेध करीत आहे.                                                              माजी न्यायाधीश मंजूषा नयन म्हणाल्या, “दिल्ली व पंजाब येथील ‘आप’च्या सरकारने सामान्य जनतेच्या हितासाठी मोफत वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधा सामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या आहेत.  त्याच प्रकारच्या सुविधा महाराष्ट्रातील सामान्य जनतेला ही मिळाव्यात यासाठी ‘आप’ प्रयत्नशील आहे व राहील.”                                                                                                                            ‘रयतेचे राज्य रयते साठी’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा विसर न पडू देता सर्वसामान्य जनतेनी या सरकारची जनविरोधी आर्थिक धोरणे, बेरोजगारी, महागाई या विरोधात ‘आप’ सोबत मजबुती ने उभे राहावे.

Share This News

Related Post

Crime

धक्कादायक! पुण्यातून गडचिरोलीला गेलेल्या SRPF जवानानं सहकाऱ्यावर गोळी झाडत केली आत्महत्या

Posted by - June 1, 2022 0
माओवाद्यांशी लढण्या करीता तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानानं अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना आज गडचिरोलीत…

…..त्यामुळे शिंदे फडणवीसांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त आहेत -प्रकाश आंबेडकर

Posted by - July 30, 2022 0
पुणे:राज्यात एकनाथ शिंदे गटाचे सरकार आले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची नव्हती तरी. त्यांना उपमुख्यमंत्री…
Arrest

पुण्यात भररस्त्यात कोयत्याने वाढदिवसाचा केक कापणारे गजाआड; चौघांना अटक

Posted by - April 18, 2022 0
पुणे- पुण्यात वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापणाऱ्या चौघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना मुंढव्यातील केशवनगर भागात राजमाता जिजाऊ चौकात…

पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिन साजरा

Posted by - November 26, 2022 0
पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय संविधानाची माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *