पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी साठी तयार करण्यात आलाय खास फेटा

175 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे.

पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेला भेट देणारे दुसरे पंतप्रधान ठरणार आहे. त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण यांच्यासह विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुरुडकर झेंडेवाले यांना आकर्षक असा फेटा तयार करण्यास सांगितला. त्यानंतर गिरीश मुरुडकर यांनी तब्बल ८ दिवस मेहनत घेऊन ‘शाही फेटा’ तयार केला आहे.

या बाबत अधिक माहिती देत गिरीश मुरुडकर म्हणाले की, आम्ही फेट्याचे २५ पॅटर्न पाहिले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या कपडयांना करत मॅच होणारा फेटा बनवण्याचं ठरवलं. क्रीम विथ रेड कापडचा वापर केला आहे. यासाठी पैठणीचे कापड, जरी आणि ऑस्ट्रेलियन डायमंड असे साहित्य वापरले आहेत. फेट्याच्या वरील बाजूस गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिलंय.

तर, त्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलामध्ये शिवमुद्रा बसविली आहे. सूर्यफुलाचं वैशिष्टय असं की, ते नेहमी तेजाकडे, सूर्याकडे पाहत असते,” अशीच थीम घेऊन फेटा तयार केला.

Share This News

Related Post

प्रथा-परंपरा : नागपंचमीच्या दिवशी भाज्या चिरायच्या नाही, तवा तापवायचा नाही ; पण का ? हे आहे कारण

Posted by - August 2, 2022 0
प्रथा -परंपरा : नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया…
Gondia

धक्कादायक ! झोपलेल्या मायलेकावर धारदार शस्त्राने वार; मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू

Posted by - June 8, 2023 0
गोंदिया : गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या श्रीनगर येथील चंद्रशेखर वार्डामध्ये काल बुधवारी पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तीने आई आणि…

धक्कादायक ! मानवी रक्तात आढळून आले प्लास्टिकचे सूक्ष्म कण

Posted by - March 26, 2022 0
लंडन- दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, खेळणी, ‘यूज अँड थ्रो’ काटे-चमचे यातील प्लास्टिकचे बारीक कण मानवी रक्तात…

#CREDIT CARD : क्रेडिट कार्डवर चारचाकी खरेदी करताय ? थांबा ही माहिती वाचा

Posted by - March 21, 2023 0
अर्थकारण : क्रेडिट कार्डमुळे खिशात पैसा बाळगण्याची गरज राहिलेली नाही. काहींची मर्यांदा लाखांच्या घरात असल्याने बरीच मंडळी क्रडिट कार्डवरून व्यवहार…
chitra wagh

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा; चित्रा वाघ यांची मागणी

Posted by - May 7, 2023 0
पुणे : ‘द काश्मीर फाइल्स’ नंतर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *