पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट! महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांना आंदोलन समितीतून वगळलं

269 0

पुणे: बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यात नुकतंच मोठं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात एकूण 17 संघटना सहभागी झाल्या होत्या. मात्र आता पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट पडले असून महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांना आंदोलन समितीतून वगळण्यात आलं आहे.

बाबा कांबळे यांना समितीतून वगळताना या पूर्वी अनेकवेळा समज देऊनसुद्धा सदर संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वर्तनात सुधारणा न केल्यामुळे त्यांना बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती मधून वगळण्याचा निर्णय समिती मधील उर्वरित सर्व १६ संघटनांनी एकमताने आज झालेल्या बैठकीत घेतला. त्यामुळे आता समितीत १७ ऐवजी १६ संघटना असतील. रिक्षाचालकांच्या प्रश्नांप्रती बेशिस्त व अप्रामाणिक अशी कोणतीही कृती आंदोलन समिती खपवून घेणार नसून ,चुकीचा संदेश पसरवून १२ लाख रिक्षा चालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या या आंदोलनाला कमजोर करणाऱ्या प्रति कोणतीही हायगय केली जाणार नाही याबाबत आंदोलन समितीतील सर्व सभासद ठाम आहेत व त्यांच्यामध्ये एकजूट आहे तसेच कोणत्याही प्रकारची फूट नाही. यापुढे आंदोलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सदर संघटनेचा समावेश नसेल असं आंदोलन समितीकडून सांगण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

Big Breaking : निरा नदीत सापडला पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह ; वाचा सविस्तर

Posted by - October 14, 2022 0
सातारा : राज्य सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदी पात्रात सापडून आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ…

येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिलं जाईल; कार्यालय तोडफोडीनंतर तानाजी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

Posted by - June 25, 2022 0
गुवाहाटी- राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून शिवसेनेचे 41 आमदारांसह ते गुवाहाटी दाखल…

#MURDER : सामायिक विहिरीतील पाण्यावरून जुंपली; भावकीतील कुटुंबाने काका पुतण्याला दिला असा भयानक अंत

Posted by - March 11, 2023 0
सांगली : सांगलीतील जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामायिक विहिरीच्या पाण्यावरून दोन कुटुंबामध्ये जबरदस्त वाद झाला. यानंतर…
Satara News

Satara News : एकीव धबधब्यात पडून साताऱ्यातील 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 17, 2023 0
सातारा : सातारा (Satara News) जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील (Satara News) एकिव धबधब्याच्या कड्यावरून पडून दोन…

इच्छुकांनो तयारीला लागा! महापालिकांसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत

Posted by - July 23, 2022 0
ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळं रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय. यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *