पुणे विभागातील 400 एसटी बस ‘खिळखिळ्या’ ; लालपरीची स्थिती बिकट

130 0

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीचा प्रवास सध्या खडतर स्थितीत सुरू आहे. राज्यातील १६ हजार एसटी बसेसपैकी ७ हजार बसेसची स्थिती अत्यंत वाईट असून त्या प्रवासी वाहतुकीसाठी अयोग्य बनल्या आहेत. यामध्ये पुणे विभागाची काय स्थिती आहे. पाहूया

पुणे विभागातील ८५० बसेसपैकी ४०० बस प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक बनल्या आहेत. या बसेस राज्य परिवहन महामंडळाला भंगारात काढायच्या आहेत, मात्र त्या जागी दुसऱ्या बसची उपलब्धता नसल्याने त्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका आहे.एसटीच्या अपघाताचे प्रमाण जरी कमी असले तरीही ब्रेक डाऊनच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्याबरोबरच देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील वाढत आहे. वर्षाकाठी ६० हजार एसटी बस ब्रेकडाऊन होत आहेत. एसटी बसची स्थिती खराब झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांचा वेळ वाया जाऊन गैरसोय देखील होते. डेपोतून निघताना या बसची कधी पाहणी होते, तर कधी नाही. या पार्श्वभुमीवर धोकादायक बसेस प्रवासी सेवेतून हटवणे गरजेचे आहे.

Share This News

Related Post

MHADA

MHADA : म्हाडातर्फे आरामदायी व आधुनिक सुविधांनी सज्ज ‘ ईडन गार्डन’ गृहप्रकल्प सादर

Posted by - October 16, 2023 0
पुणे : आपलं स्वतःचे हक्काचे घर (MHADA) असावे, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते. सामान्य माणसाचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने…

विवाहित प्रेयसीने दिला दगा, प्रियकराने संपवले जीवन

Posted by - April 5, 2022 0
पिंपरी- विवाहित प्रेयसीने लग्नाच्या आणाभाका देऊन ऐनवेळी आपल्या विवाहित प्रियकराला नकार देऊन त्रास दिला. या प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली.…
Amitesh Kumar

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Posted by - May 24, 2024 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन्स केसची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर…
CBI

हनीट्रॅप प्रकरणी मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल; CBI ची मोठी कारवाई

Posted by - May 16, 2023 0
पुणे : सीबीआयने (CBI) मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी (Journalist Vivek Raghuvanshi) यांच्याविरुद्ध हेरगिरी केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. सीबीआयकडून…

सामूहिक राष्ट्रगीत उपक्रम : चला सारेजण राष्ट्रगीत गाऊ या ; एक अनोखा विक्रम करू या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - August 16, 2022 0
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत नियोजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *