पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! 40% मिळकत करातील सवलत कायम राहणार

1084 0

पुणे: पुणेकरांना मिळकतकरात वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत कायम ठेवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबई येथे बैठक झाली असून या बैठकीत पुणेकरांना  मिळकत करात 40 टक्के सवलतीसह तीन पट शास्ती रद्द करण्यासचा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

पुढच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव दाखल होऊन शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळाली असून या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे

40% मिळकत कर सवलतीचं नेमकं प्रकरण काय आहे पाहुयात

40% कर सवलतीचा नेमका विषय काय आहे.समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून

पुणे महानगरपालिकेकडून मिळकत करात 40% सवलत मिळत होती.

2018 मध्ये राज्य सरकारकडून ही कर सवलत बंद करण्यात आली होती. तसेच हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेला देण्यात आले होते.

40 टक्के कर सवलत बंद झाल्याने पुणेकरांना भरमसाठ मिळकतकराची बिलं येत आहेत

काही दिवसांपूर्वीच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्ती करून या वसुलीला स्थगिती दिली होती मात्र याबाबतचे लेखी आदेश अद्यापही पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेले नाहीत

एक एप्रिल पासून नवीन वर्षाची मिळकत कराच्या बिलांचं वाटप पुणे महानगरपालिकेकडून सुरू होईल याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर येत आहे.

Share This News

Related Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर पुण्यात मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Posted by - April 4, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणांवरून राजकारण चांगलेच तापले आहे.मशिदीवर धाडी टाका, आणि भोंगे काढा, अशा आशयाचे विधान…

यंदा माऊलींची पालखी ११ जूनला आळंदीतून प्रस्थान ठेवणार

Posted by - April 12, 2023 0
यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायीवारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई…

पुणे ते कात्रज रस्ता (जुना कात्रज घाट रस्ता) एकेरी वाहतूक करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

Posted by - November 30, 2022 0
पुणे : पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु…
Pune University

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे करण्यात येणार आयोजन

Posted by - December 2, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (University of Pune) जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *