Result

बारावीचा निकाल जाहीर; 91.25% विद्यार्थी उत्तीर्ण

175 0

पुणे : बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावेळी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा मुलींच्या निकालाची टक्केवारी 93.73% आहे तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 89.14% आहे. राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के लागला आहे. 96.01 टक्के कोकण विभागाचा लागला आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेला 14 लाख 28 हजार नियमित विद्यार्थी बसले होते. 154 विषयांसाठी 12 वीची परीक्षा झाली होती. विद्यार्थ्यांना आपला निकाल आज दुपारी 2 वाजता पाहता येणार आहे. 5 जूनला विद्यार्थांना गुणपत्रिका मिळणार आहे.

कुठे पाहाल निकाल?
बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in
4) www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

यंदा विज्ञान शाखेचा निकाल 96.09%, कला शाखेचा निकाल 84.05%, वाणिज्य शाखेचा निकाल 90.42%, पुणे विभागाचा निकाल 93.34% लागला आहे.

विभागानुसार 12 वीचा निकाल
कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
कोल्हापूर 93.28 टक्के
औरंगाबाद 91.85 टक्के
नागपूर 90.35 टक्के
अमरावती 92.75 टक्के
नाशिक 91.66 टक्के 
लातूर 90.37 टक्के
मुंबई 88.13 टक्के

गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी 2.97 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी 94.22 टक्के निकाल लागला होता. यावर्षी मात्र 12 वीच्या निकालाचा टक्का घसरला असून निकाल 91.25 टक्के लागला आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

Posted by - March 29, 2022 0
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते…
Shri Kesariwada Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री केसरीवाडा गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…
Rahul Kalate

Rahul Kalate : राहुल कलाटे यांनी घेतली उदय सामंत यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Posted by - June 23, 2023 0
पिंपरी: उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) गुरुवारी दि. 22 जून रोजी पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) महापालिकेत आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या…
Saurabh Tripathi

Saurabh Tripathi : वादग्रस्त पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती

Posted by - August 29, 2023 0
मुंबई : खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने वादात अडकलेले आणि त्यानंतर अनेक महिने फरार असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi)…

वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - March 24, 2023 0
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *