raj-thackeray

‘आपला आदेश आम्हाला शिरसावंद्य’; भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर सामान्य कार्यकर्त्याचे राज ठाकरेंना भावनिक पत्र

457 0

मुंबई : नेहमीच सत्ताधारी पक्षांना आपल्या भाषणातून चपराक देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात वेगळी भूमिका घेतली. त्यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर काही मनसैनिक नाराज झाले, काहींनी चक्क पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. तर काहींनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा समर्थन केले. अशाच एका मनसैनिकाने राज ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. जे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

पत्रात नेमके काय लिहिले आहे ?
‘आदरणीय साहेब, सर्वप्रथम तुम्हाला सस्नेह जय महाराष्ट्र! नुकताच आपला गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर साजरा झाला. या मेळाव्यात आपण जी भूमिका घेतली, ती अतिशय योग्य असून आम्हाला आपण घेतलेली भूमिका मनापासून मान्य आहे. आपला आदेश आम्हाला शिरसावंद्य होता, आहे आणि राहील. आपल्या आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन करु. साहेब, 2006 पासून आम्ही तुम्ही ठरवाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण या वाक्यानुरूप वाटचाल करत आलोय आणि यापुढेही त्यात तसूभरही बदल होणार नाही. आपलाच, महाराष्ट्र सैनिक’, असा मजकूर या पत्रात लिहिलेला आहे. मात्र या पत्रावर कोणाचेही नाव नाही. त्यामुळे पत्र नेमके कोणी लिहिले ते स्पष्ट झालेले नाही.

राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे राज्यात आणखी एक नवीन समीकरण तयार झाले आहे. दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले असल्याची भावना मनसैनिकांच्या मनात आहे. मात्र नेहमीच मागच्या निवडणुकावेळी आपल्या भाषणाच्या माध्यमातून भाजपच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढणारे राज ठाकरे आता भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यामुळे बरेचसे मनसैनिक हे नाराज झालेले पाहायला मिळत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

Jayant Patil : ‘आता जनताच ठरवेल कोण असली कोण नकली?’ जयंत पाटलांचं अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Loksabha : शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला वंचित कडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

Share This News

Related Post

सुनावणी लांबणीवर…!राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष

Posted by - July 11, 2022 0
मुंबई :एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावलेल्या नोटिशींविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली…

हनुमान जयंतीच्या प्रसादातून ५० जणांना विषबाधा, दोघे गंभीर, नाशिक जिल्ह्यातील घटना

Posted by - April 8, 2023 0
हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिक सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव…
Mumbai News

Mumbai News : पुणे, नागपूरनंतर आता मुंबईमध्ये हिट अँड रनची घटना; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

Posted by - May 26, 2024 0
मुंबई : पुण्यात अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडलं होतं. हि घटना ताजी असताना (Mumbai News) नागपुरमधील महाल भागातील झेंडा…

Rahul Gandhi : ” देशातील प्रत्येक यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणात “

Posted by - August 5, 2022 0
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रपती भवन नावर मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह…
Rohit Pawar

Rohit Pawar : सरळसेवा भरतीसाठी One Time Registration पद्धत सुरु करा; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Posted by - August 30, 2023 0
मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ ही एकच आग्रही मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *