Vasant More

मोठी बातमी; वसंत मोरे ‘शिवबंधन’ बांधणार? आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट

493 0

पुण्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून पुण्यातील फायर ब्रँड नेते माजी नगरसेवक वसंत मोरे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि त्यामुळेच वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलय.

12 मार्च 2024 रोजी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करत पुणे लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत वसंत मोरे यांना केवळ 32000 इतकी मतं मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश करतील असं बोललं जात असून जर वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी देखील मिळू शकते अशा चर्चा सुरू झाल्यात.

2007 मध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक झालेल्या वसंत मोरे यांनी 2007 2012 आणि 2017 या तिन्ही निवडणुकांमध्ये पुणे महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केलं असून पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनते पदही मोरे यांनी भूषवलं आहे.

Share This News

Related Post

पुणे: भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा मृत्यू

Posted by - November 13, 2022 0
रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर  केळावडे गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर…
Supriya Sule

Supriya Sule : जोरदार शक्तिप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंनी भरला आपला उमेदवारी अर्ज

Posted by - April 18, 2024 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज…
Pune Video

Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव

Posted by - July 10, 2023 0
पुणे : रुग्णवाहिका हि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असते. मात्र पुण्यामध्ये (Pune Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चक्क एका…

मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Posted by - March 8, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेकडून मिळकत करातून देण्यात येणारी 40 टक्के सवलत रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन…
Dheeraj Ghate

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी-धीरज घाटे

Posted by - December 3, 2023 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ने मध्यप्रदेश, राजस्थान, तसेच छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *