गद्दारांना आता धडा शिकवणारच! विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंगनंतर नाना पटोले ॲक्शनमोडवर

529 0

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ पैकी नऊ उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना अवघी बारा मतं मिळाली आणि त्यांचा दारुण पराभव झाला.

या निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांची मतं फुटली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून क्रॉस व्होटिंग विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच ॲक्शन मोडवर आले असून नाना पटोले यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत आता गद्दारांना धडा शिकवणारच असं म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ते काम करत आहेत मात्र या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आमदार निवडून येतात. मात्र काही लोक निवडून आल्यानंतर पक्षाशी विश्वासघात करतात आणि क्रॉस व्होटिंग करतात. मागील विधान परिषद निवडणुकीमध्ये ही असाच प्रकार घडला होता पण यावेळी आम्ही अशा लोकांना धडा शिकवणार आहोत.

नाना पटोले यांची फेसबुक पोस्ट 👇

https://www.facebook.com/share/p/GTNya8YhD3bNEp1r/?mibextid=oFDknk

नाना पटोले यांच्या या फेसबुक पोस्ट नंतर क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात काँग्रेस काय निर्णय घेत आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

Share This News

Related Post

राज्यातील सर्व दुकानं व आस्थापनांना मराठी नामफलक लावणं बंधनकारक ! शासनाकडून अधिनियम लागू

Posted by - March 30, 2022 0
राज्यातील सर्व दुकानं व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच…

गुजरात मोरबी पूल दुर्घटना; मृतांचा आकडा 35 वर, पंतप्रधानांनी दुर्घटनेची महिती

Posted by - October 30, 2022 0
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत…
Raigad Accident

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Posted by - December 30, 2023 0
रायगड : रायगडमधून (Raigad Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी…

उद्या मंत्रिमंडळविस्तार…! ‘गृह’ आणि ‘अर्थ’ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार ?

Posted by - August 8, 2022 0
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती समोर आली…

ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का? खासदार प्रताप जाधव यांचा मोठा दावा; ‘ते’ 8 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात येणार, वाचा सविस्तर

Posted by - November 22, 2022 0
बुलढाणा : बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता आहे. खासदार प्रतापराव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *