देवेंद्र फडणवीस आपल्याच ‘ओएसडी’ यांना का आणत आहेत सक्रिय राजकारणात ?

477 0

 

नुकतीच भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा, विधानसभानिहाय्य निवडणूक प्रमुखांच्या निवडी जाहीर करण्यात आला असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राहिलेल्या सुमित वानखेडे यांच्याकडं वर्धा लोकसभेची जबाबदारी मिळाली आहे. सुमित वानखेडे यांच्या रूपानं देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक ओएसडी सक्रिय राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत. नेमकं या अगोदर देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी म्हणून काम केलेलं कोण-कोण सक्रिय राजकारणात आलं आहे पाहुयात आजच्या TOP NEWS INFO मध्ये…

सध्या सर्वच पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत असून या अनुषंगाने भाजपानं 48 लोकसभा निवडणूक प्रमुख आणि 288 विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या निवडी जाहीर केल्या आहेत यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी असलेल्या सुमित वानखेडे यांच्या वर्धा लोकसभेची जबाबदारी देण्यात आहे. या आगोदर फडणवीस यांचे OSD म्हणून काम केलेले नेमके कोण सक्रिय राजकारणात आलं पाहुयात

श्रीकांत भारतीय: श्रीकांत भारतीय यांची भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून राबविण्यात येणाऱ्या महाविजय 2024 चे संयोजक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे.

अभिमन्यू पवार: अभिमन्यू पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलं आहे सध्या ते औसा विधानसभेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत.

सुमित वानखेडे: देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून सुमित वानखेडे यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. सुमित वानखेडे यांच वर्धा जिल्ह्याशी वेगळं नातं आहे. ते मूळचे आर्वीकर आहेत, मात्र त्यांची सासुरवाडी वर्धा आहे. आता वर्धा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी सुमित वानखेडे यांच्या खांद्यावर असणार आहे.

दरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांचा आणखी ओएसडी सक्रिय राजकारणात येणार का ? हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News

Related Post

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : अमेठी मधून स्मृती इराणी पराभूत

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल…

यूपीएससीच्या निकालात मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली

Posted by - May 30, 2022 0
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे. श्रुती…

आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा !

Posted by - July 10, 2022 0
  पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण मंदिराला…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर : मुरलीधर मोहोळ

Posted by - May 7, 2024 0
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी 70 टक्के ऐवजी 51 टक्के झोपडीधारकांची संमती, तीनशे चौरस फुटांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *