TOP NEWS MARATHI INFO: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटक झालेली अनिक्षा जयसिंघानी कोण आहे?

921 0

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अनिक्षा जयसिंघानी नावाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे मात्र ही अनिक्षा जयसिंघानी नेमकी आहे तरी कोण आणि हे संपूर्ण प्रकरणं काय पाहूयात टॉप न्यूज इन्फो मधून

अनिक्षा जयसिंघानी सट्टेबाजी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिल जयसिंघानीवर महाराष्ट्र गोवा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, फसवणूक करणं असे गुन्हे आहेत अनिक्षाने कायद्याच्या विषयात पदवी घेतली आहे. अनिक्षा तब्बल 16 महिन्यांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे. अनिशा जयसिंघानी पेशानी फॅशन डिझायनर असून ती कपडे ज्वेलरी डिझाईन करते 2021 मध्ये अनिक्षा अमृता फडणवीस यांना भेटली होती तिने फॅशन विश्वातल्या विविध गोष्टी सांगितल्या आणि अमृता फडणवीसांचा पूर्ण विश्वास संपादन केला. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं की अमृता फडणवीस यांना अनिक्षा ने धमकी दिली होती की, जर सरकारने अनिल जयसिंघानी यांच्या विरोधातली प्रकरणं मागे घेतली नाही तर मी तुम्हाला लाच घेतल्याच्या प्रकरणात अडकवू शकते. हे सगळं प्रकरण राजकीय आहे का यावर आपण लवकरच भाष्य करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

अमृता फडणवीस यांनी अनिक्षाच्या विरोधात जो FIR केला आहे त्या तक्रारीत त्यांनी काय म्हटलंय

नोव्हेंबर २०२१ साली पहिल्यांदा भेट झाली होती.

आरोपी अनिक्षाने अमृता यांना सांगितले होते की, ती कपडे आणि दागिन्यांची डिझायनर आहे. मी डिझाईन केलेले कपडे आणि दागिने अमृता यांनी सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती आरोपी अनिक्षा हिने केली होती आणि ती मी मन्या केली.

यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत स्पष्ट केले.

अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे की काही कालावधीनंतर अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने मला धमकी दिली आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचलं

पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांच्या विरोधात IPC च्या कलम १२० बी नुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अमृता फडणवीस यांनी ही एफआयआर मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला दाखल केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील सांगितलं की अनिक्षाकडून अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचं आमीष देण्यात आलं होतं. तसंच या मुलीने माझे संपर्क विविध पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी आहेत असंही सांगितलं. आता या अनिक्षाला पोलिसांनी अटक केली असून राजकारणावर याचा काय परिणाम होणार आणि तिच्याकडून काय काय माहिती मिळणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News

Related Post

Weather Update

Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान खात्याने दिला ‘हा’ नवीन अलर्ट

Posted by - May 8, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका (Weather Update) बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि…

अखेर शिंदे आणि ठाकरेंमध्ये दिलजमाई! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Posted by - October 6, 2022 0
जुन्नर : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय व दसरा मेळाव्याची चालु असलेली राजकिय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा…

#Travel Diary : या उन्हाळ्यात हिल स्टेशनला भेट द्यायचा विचार करताय ? देवभूमी उत्तराखंडमधील ‘ही’ ठिकाणे परफेक्ट

Posted by - February 28, 2023 0
देवांची भूमी असलेले उत्तराखंड हे भाविक आणि पर्यटक दोघांच्याही आकर्षणाचे केंद्र आहे. या पवित्र भूमीवर अनेक प्रमुख देवस्थळे आहेत. जिथे…
Parth And Sunetra Pawar

Pune District Bank : पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही

Posted by - November 8, 2023 0
पुणे : आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक (Pune District Bank) संचालकपदाची निवडणूक पार पडत आहे. अजित पवारांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *