CM EKNATH SHINDE : “निवडणूक लढवताना एकीकडे मोदींचा तर दुसरीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला होता ; म्हणूनच बहुमत मिळालं…!”(VIDEO)

266 0

पुणे :  शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिंदे गटामध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच शिवतारे यांच्या मतदारसंघात आज आले होते. यावेळी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता . या मेळाव्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे .

यावेळी भाषणादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की , “मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही. एवढं काम मी माझ्या मतदारसंघात केल आहे. आज या ठिकाणी येण्याचं मला भाग्य लाभलं. छत्रपती संभाजी राजे, आचार्य अत्रे यांची ही जन्मभूमी आहे . मी काम करणारा माणूस आहे . फाईली फिरतात मला त्यात रस नाही. बाळासाहेब ठाकरे ,अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेच सरकार आता आला आहे. आपण निवडणूक लढवत असताना एकीकडे मोदींचा तर दुसरीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला होता त्यामुळेच जनतेने आपल्याला पूर्ण बहुमत दिलं होतं अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे”

“शिवसैनिकांना या अडीच वर्षात काय मिळालं ,तडीपारची कारवाई तेवढी करण्यात आली. अडीच वर्षात आम्हाला कुणी विचारलं नाही. सामान्य शिवसैनिकाची ही भावना होती . आम्ही उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसायचं का ? नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चार नंबरवर फेकली गेली. शिवसेना भाजपच सरकार आलं असतं, तर आज काँग्रेस राष्ट्रवादी कुठे राहिली असती . ते औषधालाही पुरले नसते ,थोडं जरी मागे पुढे झालं असतं तर आमचा कार्यक्रमच झाला असता .

काही लोकांना वाटत होतं या लोकांनी राजकीय आत्महत्या केली. आम्हाला दीपक केसरकर नावाचा संत माणूस भेटला . अगोदर तो माणूस अडगळीत होता . तुम्ही तो शोधून आणला . आम्ही गद्दार बंडखोर असतो तर तुम्ही एवढ्या उन्हात आले असते का ? आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत . असेही शिंदे यावेळी म्हणाले आहेत . ”

“तसेच गुंजवणीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 50 कोटी दिले जाणार असल्यासही घोषणा देखील यावेळी त्यांनी केली आहे . उरळी पाणीपुरवठा योजनेसाठी 25 कोटी रुपये दिले जाणार आहेत . बारामतीसाठी ज्या अडचणी आहेत ,त्या दूर केल्या जातील कुठल्याही प्रकल्पाचा निर्णय तुमच्या संमती न घेतला जाईल . पुरंदरचे विमानतळ दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ,पण आमचं सरकार आल्यावर ते थांबला आहे . एकनाथ शिंदे तुमचा हक्काचा माणूस आहे . असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त करून दाखवला.

Share This News

Related Post

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात पुल कोसळला;80 जण गंभीर जखमी

Posted by - April 14, 2023 0
जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे बैन गावामध्ये उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून सुमारे 80 जण यामध्ये जखमी झाले आहेत जम्मू-काश्मीरात बैसाखी…

दीड महिन्यात 1 कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १…
Vijay-Wadettiwar

Vijay Wadettiwar : ‘हेमंत करकरेंना कसाबने नाही तर भाजप समर्पित पोलिसाने गोळी मारली’; विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाने खळबळ

Posted by - May 5, 2024 0
चंद्रपूर : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्वच राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. असाच एक आरोप…

इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय ? भारतामध्ये कुठे बांधला जाणार ? जाणून घ्या

Posted by - April 6, 2022 0
इलेक्ट्रिक हायवे- देशात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांसाठी भारत सरकारने मोठी बातमी आणली आहे. ही…
Sangli News

Sangli News : सांगली हादरलं ! डोक्यात फावड्याने वार करुन बापाने काढला लेकाचा काटा

Posted by - August 5, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) बाप आणि लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Sangli News) व्यसनी मुलाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *