राऊत नहीं तो क्या हुआ ? उनके नाम की कुर्सी ही काफी है..!

198 0

गोरेगावातील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा भरवण्यात आलाय. या मेळाव्यास देशभरातील गटप्रमुख आपली हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याच्या व्यासपीठावर ठेवण्यात आलेली एक खुर्ची मात्र सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतेय. उद्धव ठाकरेंच्या खुर्चीच्या डाव्या बाजूला चौथ्या रांगेत ही खुर्ची मांडण्यात आलीये. ही खुर्ची ज्यांच्या नावानं आरक्षित करण्यात आलीये ते नाव कुणाचं आहे माहितीये ? चक्क संजय राऊत !

………………………..

संजय राऊत नसतानाही त्यांच्या नावाची खुर्ची ?

संजय राऊत तर सध्या ईडीच्या कोठडीत आहेत हे शिवसैनिकच काय अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे मग त्यांच्या नावाची खुर्ची या मेळाव्याच्या ठिकाणी का ठेवण्यात आली असावी ? आयोजकांकडून अनावधानानं ही चूक झालीये की ती खुर्ची जाणूनबुजून ठेवण्यात आलीये की यामागं शिवसेनाचा काही ‘हिडन प्लॅन’ आहे ? आदी विविध तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत.
……………………….

मुलुख मैदानी तोफ कोठडीत पण नावाची खुर्ची मात्र मेळाव्यात

गेली अनेक वर्षे विरोधकांच्या उरात धडकी भरवणारी
शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ अर्थात खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी त्यांना ईडीनं अटक केली होती. त्यानंतर आजपर्यंत ते ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत कोठडीत असताना इकडं पुलावरून बरंच पाणी वाहून गेलंय. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना दसरा मेळाव्याचं मैदान कोण मारणार यावरून शिवसेना-शिंदे गटात राजकीय वणवा पेटलाय. गेली कित्येक वर्षे ज्या मैदानावर शिवसेनेचा ‘दसरा दरबार’ भरतो ते शिवाजी पार्क मैदान मिळवताना शिवसेनेच्या नाकीनऊ आलंय. या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना ‘चार्ज’ करण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा भरवण्यात आलाय हे जरी खरं असलं तरी संजय राउतांविना हा मेळावा पार पाडणं शिवसेनेला जरा जड जातंय हेही तितकंच खरं !

………………………..
एकूणच काय तर या मेळाव्यास संजय राऊत प्रत्यक्ष उपस्थित नसले म्हणून काय झालं ? त्यांच्या नावाची खुर्ची तर आहे ! राऊत नहीं तो क्या हुआ ? उनके नाम की कुर्सी ही काफी है..! 

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक,TOP NEWS मराठी 

Share This News

Related Post

चार धाम यात्रा 2023 : ‘या’ दिवशी उघडणारा बद्रीनाथ धामचे दरवाजे, वाचा मुहूर्त आणि बद्रीनाथचे विशेष महत्व

Posted by - January 28, 2023 0
चार धाम यात्रा 2023 : हिंदू धर्मात चारधाम यात्रेला खूप महत्त्व आहे. चार धाम यात्रा दरवर्षी विशिष्ट कालावधीसाठी सुरू होते.…

पुणे जिल्ह्यात जुन्नर पंचायत समितीचा उमेद व ग्रामपंचायत विभागात प्रथम क्रमांक

Posted by - April 10, 2022 0
पुणे जिल्ह्यात जुन्नर पंचायत समितीला उमेद व ग्रामपंचायत विभागात प्रथम क्रमांक मिळाला तर पंचायत समितीच्या कामात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.…

स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असेल तर या टिप्स फॉलो करा

Posted by - June 18, 2022 0
सोशल मीडिया, चॅट, कॉलिंग यामुळे स्मार्टफोनचा वापर खूप केला जातो. साहजिकच फोनची बॅटरी लवकर संपते. त्यासाठी काही सोपे उपाय केल्यास…
Mayawati

Mayawati : मायावतींनी उत्तराधिकारी म्हणून ‘या’ नेत्याचे नाव केले जाहीर

Posted by - December 10, 2023 0
बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी आज मोठी घोषणा केली. मायावती यांनी त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केला आहे. त्यांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *