नवी दिल्ली: बहुचर्चित अशा काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान होत असून मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदा करता निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये खर्गे यांचा पार्ट जड मानलं जात असून सकाळी 10 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत देशभरातील 40 केंद्रांवर मतदान होणार आहे यामध्ये 9800 प्रदेश प्रतिनिधी मतदानात भाग घेणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे हे बंगळूर मध्ये तर शशी थरूर हे तिरुअनंतपुरम येथे मतदान करतील तर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी,डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका गांधी मतदान करणार असून सध्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले राहुल गांधी कर्नाटक मध्ये मतदानाचा हक्क बजावतील.