राष्ट्रपती पदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड

281 0

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यामुळे लवकरच देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत.  निकालानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.

संसदेत मतदानाच्या प्रक्रियेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. एनडीएकडून उमेदवार असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे.  त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी १० वाजता ही प्रक्रिया सुरु होईल. सर्व आमदार विधिमंडळात मतदान करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत 25 जुलैला संपत आहे. 21 जुलैला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) द्रौपदी मुर्मू आणि संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (यूपीए) माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार आहेत. द्रौपदी मुर्मू या आधी झारखंडच्या राज्यपाल होत्या.

द्रौपदी मुर्मू यांचा पारडे जड असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. मुर्मू यांना विविध पक्षांना पाठिंबा मिळला आहे. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मुर्मू यांचा विजय झाल्यास आदिवासी समाजाशी संबंधीत असलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती बनतील.

Share This News

Related Post

Breaking ज्या पायरीवर पाडले त्याच पायरीवर किरीट सोमय्या यांचा झाला जंगी सत्कार

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेत शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर किरीट सोमय्या ज्या पायरीवर पडले त्याच पायरीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचा सत्कार…

TOP NEWS मराठीचा ‘स्पेशल रिपोर्ट’ : राज्यपालांना पदावरून हटवणं शक्य आहे का ? जाणून घ्या राज्यपालांना हटवण्याची प्रक्रिया

Posted by - December 5, 2022 0
TOP NEWS मराठीचा ‘स्पेशल रिपोर्ट’ : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राज्यपालांना पदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे…

गडचिरोली पूर परिस्थिती : जादा बचाव पथके पाठवावी,मुख्यमंत्र्यांचे राज्य मंत्रिमंडळात प्रशासनाला निर्देश

Posted by - July 14, 2022 0
गडचिरोली : गडचिरोली येथील पूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी नागरिकांचे स्थलांतर तसेच मदत कार्यासाठी तत्काळ अधिकची एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके…

वसंत मोरे यांचे समर्थक माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे यांचा मनसेला रामराम ?

Posted by - May 20, 2022 0
पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमध्ये अंतर्गत कुरबुरी, तक्रारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे मनसेला आणखी एक…
Ajit Pawar

Ajit Pawar : आधी विरोध केला आता प्रचार करणार; अजितदादांच्या विरोधकांना यंदा करावा लागणार त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार

Posted by - March 30, 2024 0
पुणे : अजित पवार (Ajit Pawar ) यांनी महायुतीत प्रवेश केल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा आणखी किचकट झाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *