कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

322 0

पुणे:  कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. 

या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे तर कसबामध्ये दुहेरी लढत होत आहे. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवत आहेत तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.

पीएमपीएमएलच्या 43 बसेस, सात मिनीबस आणि दहा जीपद्वारे मतदान कर्मचारी हे मतदान साहित्यासह शनिवारी आपापल्या मतदान केंद्रांवर मुक्कामी रवाना करण्यात आल्याचे या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पीआयबीएमचा 14 वा दीक्षांत समारंभ पुणे येथे संपन्न

Posted by - March 4, 2024 0
पुणे : “आजच्या पिढीला 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल. आजच्या तरुण पिढीने कल्पक…

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोले यांची राष्ट्रवादीवर टीका

Posted by - May 11, 2022 0
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असं सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला,…

ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून खासदार राहणार; वायनाडच्या जागेबाबत काँग्रेसनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - June 17, 2024 0
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी  केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे  यांनी…
Pune News

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

Posted by - March 3, 2024 0
पुणे : मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होत (Pune Traffic News) असलेली…

महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात राजभवनला घेराव घालणार !: नाना पटोले

Posted by - August 4, 2022 0
मुंबई: केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *