Vinod Patil

Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

298 0

छ. संभाजीनगर : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विनोद पाटील (Vinod Patil) हे महायुतीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.मात्र या जागेवर शिवसेनेकडून शिवसेना नेते संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर विनोद पाटील यांनी तातडीने नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले विनोद पाटील?
आजची चर्चा सकारात्मक झाली, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छूक आहे. परवा महायुतीकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही इच्छा होती की मी इथून निवडणूक लढवावी. मात्र महायुतीमधील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता. या निर्णयावर अजूनही पुनर्विचार होईल अशी मला अपेक्षा आहे.मतदारसंघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचं गणित आहे, ती चर्चा करण्यासाठी मी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आलो होतो.आश्वासन मिळावं यासाठी ही भेट नव्हती.मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकतीने ही निवडणूक लढविणार. या जागेवर मी इच्छुक आहे. त्यामुळे आता महायुतीने ठरवायचं आहे, असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. यामुळे आता छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट आता आहे.

चौरंगी लढत होणार?
छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरें यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी एमआयएमकडून पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.ही तिहेरी लढत होत असताना विनोद पाटलांनीदेखील निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने या ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Jitendra Awhad : खळबळजनक ! आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगने दिली धमकी

Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट

Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग

Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Mahua Moitra

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; ‘ते’ प्रकरण आले अंगलट

Posted by - December 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स…

गटनेतेपदी अजय चौधरीच ! विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची मान्यता, शिंदे गटाला धक्का

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- महाराष्ट्रात एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे…
Fire

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर झालेल्या दुर्घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटातील (Khandala Ghat) कुणे पुलावर (Kune Bridge) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर…

ब्रेकिंग न्यूज ! पावसाची अडचण नसलेल्या भागात निवडणूक घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Posted by - May 17, 2022 0
नवी दिल्ली- जिथे पावसाची अडचण नाही अशा भागात निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र ज्या ठिकाणी…
Loksabha Elections

Loksabha Elections : भाजपला आणखी एक धक्का ! मोहिते पाटलांनंतर ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Posted by - April 15, 2024 0
सांगली : माढा लोकसभेतून (Loksabha Elections) उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *