महाराष्ट्र विधानसभा 2024 साठीचं मतदान काल पार पडलं. सकाळच्या सत्रात नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. मात्र मतदानाच्या अंतिम टप्प्यात मतदानाने जोर धरल्याचं पाहायला मिळालं. राज्यात एकूण 65.11% मतदान झालं. त्यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोल नुसार पुण्यात नेमकं काय होऊ शकतं ? कोणाचा किती जागा निवडून येऊ शकतात ? याचा अंदाज बांधला जात आहे.
काय सांगतात एक्झिट पोल ?
मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील. तर अपक्ष आणि बंडखोरांना आठ ते दहा जागा मिळू शकतात. तर चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार माहितीला 150 ते 160 जागांवर यश मिळू शकतं आणि अपक्षांना सहा ते आठ जागा मिळू शकतात. तर जेव्हीसीच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला अंदाजे 115 तर महायुतीला 158 ते 160 जागांवर विजय मिळवू शकतो. त्याचबरोबर अपक्ष आणि लहान-मोठे पक्षांना मिळून 12 ते 13 जागा मिळतील अशी शक्यता एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात कुणाची सत्ता ?
सध्या महायुतीची सत्ता असलेल्या पुण्यात सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला. एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 11 जागांवर महाविकास आघाडीला तर दहा जागांवर महायुतीला विजय मिळवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हे एक्झिट पोल किती खरे ठरणार हे अंतिम निकाल आल्यावरच स्पष्ट होईल.
पुण्यात विजय कुणाचा ?
195 – जुन्नर – मविआ
196 – आंबेगाव – मविआ
197 – खेड आळंदी – मविआ
198 – शिरुर – महायुती
199 – दौंड – मविआ
200 – इंदापूर – मविआ
201 – बारामती -महायुती
202 – पुरंदर – मविआ
203 – भोर – मविआ
204 – मावळ – महायुती
205 – चिंचवड – महायुती
206 – पिंपरी – महायुती
207 – भोसरी – महायुती
208 – वडगाव शेरी – मविआ
209 – शिवाजीनगर – महायुती
210 – कोथरुड – महायुती
211 – खडकवासला – महायुती
212 – पार्वती – महायुती
213 – हडपसर – मविआ
214 – पुणे कॅन्टोन्मेंट – मविआ
215 – कसबा पेठ – मविआ