तात्यांचं ठरलं! ‘या’ दिवशी करणार ठाकरे गटात प्रवेश

418 0

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे आता वंचित ची साथ सोडणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

वंचित ला सोडचिठ्ठी देत आता वसंत मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत असून येत्या 9 जुलै रोजी वसंत मोरे याचा मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

वसंत मोरे यांनी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जात भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचा बोलला जात आहे.

12 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला होता पुणे लोकसभा निवडणूक देखील वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढवली होती. मात्र या निवडणुकीत अवघी 32000 मतं पसंत मोरे याच्या पदरात पडली. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे ठाकरे घटक प्रवेश करत असल्याचं देखील बोलला जात असून खडकवासला अथवा हडपसर विधानसभा मतदार संघातून वसंत मोरे निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती

Posted by - March 4, 2024 0
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील कोडित गावात पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या (Pune News) अफूच्या शेतीनंतर पुन्हा मावाडी गावातील शेतात अफूची लागवड केल्याचा…

“…त्यांना टार्गेट करून निलंबन करण्यात आलं !” जयंत पाटील यांच्या निलंबनाबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाविरोधत विरोधक एकवटले. सरकार अन्याय करत असल्याची भावना आहे.…
Pune News

Pulse Polio : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा 223 बालकांनी घेतला लाभ

Posted by - March 3, 2024 0
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय पोलिओ लसीकरण (Pulse Polio) मोहिमे अंतगर्त आयोजित पल्स पॉलिओ लसीकरण मोहिमेला…
Bajirao Khade

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Posted by - April 24, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बंडखोरी केलेले काँग्रेसचे (Congress) माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव…

राष्ट्रवादी ‘अजित दादांची’; घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे

Posted by - February 6, 2024 0
*महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल दिला असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *