पंकजा मुंडे यांना डावलून विधान परिषदेची उमेदवारी मिळवलेल्या उमा खापरे आहेत तरी कोण ?

271 0

मुंबई- राज्यात विधानपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपले उमेदवार घोषित केले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना डावलून पिंपरी-चिंचवडच्या उमा खापरे यांना उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या उमा खापरे आहेत तरी कोण ?

उमा खापरे या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या त्या समर्थक असून भाजपच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग दोन वेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केले आहे. 2001-2002 मध्ये पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भूषवले आहे. महिला मोर्चा प्रदेश सचिव पदासह त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. 2000 ते 2002 भाजप महिला मोर्चा सचिव तर 2002 ते 2011 तीन टर्म भाजप महिला मोर्चा सरचिटणीस होत्या. 2017 ते 2020 या काळात त्या सोलापूरच्या प्रभारी होत्या. सध्या त्यांच्याकडे भाजप महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं.

Share This News

Related Post

ई-बाईक चार्ज करताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शोरूम जळून भस्मसात ; 8 जणांचा होरपळून मृत्यू

Posted by - September 13, 2022 0
तेलंगणा : हैदराबाद मधील सिकंदराबाद येथे एका इलेक्ट्रिक बाइक शोरूम मध्ये मोठी आगीची घटना घडली आहे. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी…

‘मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार, पण…. ‘ उद्धव ठाकरे यांचे बंडखोरांना भावनिक आवाहन

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय,…
Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Posted by - February 23, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले ते…

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी अनुभवसिद्ध पद्धतीने माहिती गोळा करावी

Posted by - May 21, 2022 0
पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळविलेल्या माहितीच्या आधारीतच अंतिम अहवाल केला जावा, अशा मागणीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *