मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काँग्रेस नेता सर्वोच्च न्यायालयात

579 0

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आमदार दिलीप लांडेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात दावा ठोकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे यांच्यासह सहा जणांना नोटीस पाठवत सहा आठवड्यांत उत्तर मागितले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीशी संबंधित प्रकरण आहे.

२०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे, सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी दिलीप लांडे यांचा प्रचार करताना प्रचाराची वेळ संपली तरी प्रचार केला असा आरोप नसून खान यांनी केला होता. खान यांनी चांदिवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत नसीम खान यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव झाला होता. प्रचारादरम्यान आपण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, असेही खान यांनी याचिकेत म्हटले आहे.

निवडणूक हरल्यानंतर खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र , मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाने एकतर्फी व अन्यायकारक पद्धतीने याचिका रद्द केल्याचे म्हटले आहे.

Share This News

Related Post

पुण्यात वातावरण तापले : वंचित बहुजन आघाडीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने

Posted by - December 10, 2022 0
पुणे : आज कोथरूडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी…
Rohit Pawar

Rohit Pawar : सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत रोहित पवारांना रडू कोसळले

Posted by - May 5, 2024 0
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होणार…
Raigad Accident

Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात

Posted by - December 30, 2023 0
रायगड : रायगडमधून (Raigad Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी…

Cyber Crime : सावधान …! सायबर गुन्हेगारांची नवीन शक्कल ; विद्यार्थीची शालेय पुस्तके ऑनलाइन पुस्तके खरेदी करताय ? हि बातमी वाचाच… !

Posted by - August 5, 2022 0
मुंबई : शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय पुस्तके खरेदीची लगबग वाढली आहे. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगारांनी आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *