उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत! अन्यथा….

457 0

राज्यातील सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. त्यामुळे ते आता संजय राऊतांची भाषा बोलू लागले आहेत. मात्र, उद्धवजी आपल्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. आपण शब्द जपून वापरावेत, असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच, आमच्या नेत्यांवर टीका कराल, तर जशास तसे उत्तर मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरील उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सध्या राज्याच्या राजकारणात टीका करण्यासाठी काही नेते अगदी खालच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे हे संयमी नेते होते. मात्र, सत्ता हातून गेल्यापासून ते हताश झाले आहेत. त्यामुळे सध्या उद्धवजी संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. त्यांनी सांभाळून बोलावे. अन्यथा जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले

Share This News

Related Post

महत्वाची बातमी ! धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने घेतला हा निर्णय

Posted by - April 18, 2022 0
मुंबई- नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार राज ठाकरे यांची भेट ; मनसे-भाजप युतीचे संकेत ?

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोजच नवीन खळबळ उडवणारी घटना घडते आहे. सर्वप्रथम भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…
vodafone

दूरसंचार कंपनी व्होडाफोन ‘या’ कारणामुळे 11 हजार लोकांना कामावरुन काढणार

Posted by - May 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटीश दूरसंचार कंपनी व्होडाफोनने (Vodafone) पुढील तीन वर्षांत 11,000 नोकर्‍या (Job) आपल्या कंपनीतून कमी करणार…

प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच प्रशासक घेणार पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा

Posted by - April 10, 2022 0
पुणे महापालिकेत प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच सोमवारी महापालिकेची एप्रिल महिन्याची मुख्यसभा होणार आहे. स्थायी समिती, शहर सुधारणा समितीमधून आलेल्या प्रस्तावांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *