LokSabha

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ‘या’ आहेत देशातील ‘टॉप 10 हाय वोल्टेज’ लढती; दिग्गज नेत्यांपुढे विजयाचं आव्हान

1067 0

मुंबई : लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यापासून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच लढतींचा आढावा आपण घेतलेला आहे. मात्र आज आपण देशातल्या टॉप टेन हाय व्होल्टेज लढतींविषयी बोलणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये असे 10 मतदारसंघ आहेत ज्यातील लढती या प्रतिष्ठेच्या असणार आहेत. याच 10 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊया टॉप न्यूज च्या या स्पेशल रिपोर्ट मधून…

यातील सर्वात पहिली आणि सर्वात मोठी लढत आहे वाराणसीची. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे असणार आहेत. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मोदी हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते‌. त्यामुळे यंदाही पंतप्रधान मोदी हे विक्रमी मताधिक्याने निवडून येणार का आणि विजयाची हॅट्रिक करणार का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलंय.

वाराणसी पाठोपाठ ज्या दुसऱ्या लढतीकडे देशाच्या नजरा लागलेल्या आहेत ती लढत आहे केरळ मधील वायनाडची.. पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जाणारे काँग्रेस नेते राहुल गांधी हे या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या ऍनी राजा या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. राहुल गांधी या या ठिकाणाहून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार असल्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील अमेठी मधूनही निवडणूक लढवली होती. मात्र या ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे या दहा हाय वोल्टेज लढती पैकी तिसरी लढत ही अर्थातच अमेठी लोकसभा मतदारसंघाची असणार आहे. अमेठी हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. राजीव गांधी, संजय गांधी यांनी हा गड राखला होता. त्यानंतर 2004 पासूनच्या तीनही लोकसभांमध्ये राहुल गांधींनी या जागेवर विजय मिळवला. मात्र 2019 मध्ये स्मृती इराणी यांनी त्यांना पराभूत केलं. त्यामुळे यंदा पुन्हा स्मृती इराणी येथूनच निवडणूक लढवणार आहेत. मात्र अद्याप राहुल गांधी हे या ठिकाणाहून निवडणूक लढवणार का हे स्पष्ट झालेलं नाही.

टॉप टेन हाय व्होल्टेज लढतींपैकी चौथी लढत असणार आहे गुजरात मधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघाची.. कारण या जागेवर स्वतः गृहमंत्री अमित शहा हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या सोनल पटेल निवडणुकीला उभ्या आहेत. मागच्या निवडणुकीत अमित शहा हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे यंदाही तसेच चित्र पाहायला मिळणार का याकडे देशाचे लक्ष लागलंय.

या सर्व महाराष्ट्र बाहेरील लढतील मध्ये महाराष्ट्रातीलही एक लढत लक्षवेधी ठरणार आहे. जी अर्थात बारामती मतदार संघाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तीन वेळा बारामतीत विजय मिळवला आहे. यंदाही त्याच अधिकृत उमेदवार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मधून शरद पवार गट वेगळा झाल्यामुळे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्यामुळे याच किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी बारामती मध्ये लक्ष घातलं आहे. त्यातच पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार असे लढत असल्यामुळे इथे बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

या पाठोपाठ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज या निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती हे उमेदवार असणार आहेत. दरम्यान हा मतदारसंघ भाजपचा पारंपारिक मतदार संघ आहे. कारण याच मतदारसंघातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, जगन मोहन मल्होत्रा आणि सध्याच्या केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनीही विजय प्राप्त केला होता.

पुढची महत्त्वाची लढत ही केरळमधील तिरुवअनंतपुरमची आहे. कारण या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांची विरोधात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे रिंगणात असतील. अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असलेला हा मतदारसंघ आहे. या ठिकाणी विजय मिळवणं काँग्रेससाठी महत्त्वाचं असणार आहे. कारण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पन्न्यान रवींद्रन हे सुद्धा उमेदवार आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे येत्या काळात कळेल.

या पाठोपाठ पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदार संघाच्या निवडणुकीकडेही लक्ष लागले आहे. कारण 1999 पासून सातत्याने विजय मिळवत आलेले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे या ठिकाणचे अधिकृत उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात राजकारणातील नवा चेहरा आणि क्रिकेटचे मैदान गाजवलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू युसुफ पठाण हे तृणमूल काँग्रेस कडून रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे यंदा युसुफ पठाण लोकसभेत आपलं खातं उघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

या यादीतील नऊवी हाय वोल्टेज लढत छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे होईल. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे या ठिकाणची निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे नेते संतोष पांडे हे असणार आहेत. गेल्या तीनही निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असल्यामुळे या लढतीत पुन्हा एकदा भाजप जिंकणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलं.

दहावी लक्षवेधी लढत ही रायबरेली लोकसभा मतदारसंघाची असणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या ठिकाणी विजय मिळवला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी या राज्यसभेवर गेल्यामुळे या जागेवरती काँग्रेसचा नवा उमेदवार पाहायला मिळणार आहे. या जागेसाठी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या दोघांचेही नाव चर्चेत असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आलेले नाहीत. मात्र हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे या ठिकाणी नेमकं कोण रिंगणात उतरणार, हे पाहणं औत्सुक्याचे असेल.

देशातल्या या 10 जागा इंडिया आघाडी आणि एनडीए युती यांच्यासाठी प्रचंड प्रतिष्ठेच्या आहेत. अनेक पक्षातील दिग्गज लोकसभेच्या रिंगणात आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उतरलेले आहेत. त्यामुळे या जागांवर विजय मिळवणं हे प्रत्येकच पक्षासाठी अतिशय महत्त्वाचं असेल. परंतु अर्थात विजय कोण मिळवणार, हे येत्या काळात कळेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : रणसंग्राम लोकसभेचा: महाराष्ट्रातील ‘या’ 5 मतदारसंघात होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

Smita Wagh : चर्चेतील चेहरा : स्मिता वाघ

Govinda : अभिनेता गोविंदा बनणार का राजकारणात पुन्हा एकदा हिरो नंबर 1?

Pune News : पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये युस्टाच्या नवीन दालनाचा अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते दमदार शुभारंभ

Meenakshi Patil : माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

Gold Rate : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Posted by - May 9, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर आता अजित पवार…
Mumbai Crime News

Mumbai Crime News : मुंबईमध्ये सैराटची पुनरावृत्ती ! करण-गुलनाजच्या लव्हस्टोरीचा भयानक शेवट

Posted by - October 18, 2023 0
मुंबई : मुंबईमधून (Mumbai Crime News) ऑनर किलिंगचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या मुलीची…
Loksabha 2024

Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती

Posted by - March 26, 2024 0
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) पहिला टप्प्यासाठी मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील…

पूर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत – जयंत पाटील

Posted by - July 19, 2022 0
मुंबई : राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ताबडतोब मदतकार्य सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज…

मुख्यमंत्र्यांनी ‘धर्मवीर’ पाहिला , पण सिनेमाचा शेवट न पाहताच निघून गेले असे का ?

Posted by - May 16, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिला. पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *