Ajit And Sharad Pawar

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

611 0

मुंबई : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर नुकत्याच अजित पवार गट आणि शरद पवारांच्या गटाकडून बैठका घेत शक्तिप्रदर्शन करण्यात करण्यात (TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT) आलं यावेळी भाषणात बोलताना भाजपामध्ये 75 वर्षी नेते रिटायर होत नव्या नेतृत्वाला काम करण्याची संधी देतात तुमचं वय 83 झालं तुम्ही थांबणार आहात की नाही असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता सवाल उपस्थित केला आणि त्यानंतर शरद पवारांच्या अरे मी काय म्हातारा झालोय या विधानाची पुन्हा एकदा महाराष्ट्राला आठवण झाली याच वरचा TOP NEWS मराठीचा हा (TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT) स्पेशल रिपोर्ट…

साल होतं 2019 लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाले याच दरम्यान मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. अनेक नेते सोडून जात असतानाच शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं शरद पवार यांनी आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावावी असं अनेकांना वाटत होतं मात्र पायाला भिंगरी लाऊन शरद पवार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळालं.

Nilesh Majhire : निलेश माझीरे राष्ट्रवादी दादा गटाच्या वाटेवर? शेकडो समर्थकांसह आज घेणार अजित पवारांची भेट

यावेळी एकीकडे अनेक बडे नेते सोडून जात असतानाच शरद पवारांचा राजकीय एरा संपलं असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं त्याला शरद पवार यांनी अरे अभी तो मैं जवान हु अनेकांना घरी पाठवायचं आहे म्हणत प्रत्यूत्तर देखील दिलं होतं. एका बाजूला त्यावेळी भाजपामध्ये मेगाभरती सुरू असताना आणि भाजपा महाजनादेश यात्रा करत असताना शिवस्वराज्य यात्रेने भाजपाला उत्तर देण्याची रणनीती राष्ट्रवादीनं आखली आणि या निमित्ताने शरद पवार आपल्या विश्वासू सहकाऱ्यांसह प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

Maharashtra Politics : पुलोद सरकार ते अजित पवार बंड..! ‘या’ घटनांमुळे घडला होता महाराष्ट्रात राजकीय भूकंप

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सातारच्या शरद पवारांच्या पावसातील सभेने राष्ट्रवादीला नवसंजीवनी दिली आणि राज्यात राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले त्यानंतर आपल्या राजकीय बुद्धीच्या चातुर्याच्या जोरावर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्र आले आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. दरम्यान 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर आणि आता राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीचा आव्हान शरद पवार यांच्यासमोर असताना आणि अजित पवारांनीच निवृत्त होण्याचा सल्ला दिला असताना शरद पवार नेमकी कोणती राजकीय रणनीती आखणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार (TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT) आहे.

Share This News

Related Post

Municipal Elections : महापालिकांसाठी पुन्हा 4 सदस्यांचा प्रभाग होणार ? मंत्रिमंडळ बैठकीत आज होऊ शकतो निर्णय …

Posted by - August 3, 2022 0
पुणे : पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यातील तब्बल 18 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत . या महापालिकांमध्ये सध्या तीन सदस्यांची प्रभाग रचना…
Nagpur News

Nagpur News : धक्कादायक ! गुड बाय एव्हरीवन, स्टेटस ठेवून 25 वर्षीय जिम ट्रेनर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - June 28, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सीताबर्डीच्या तेलीपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिला जिम ट्रेनरने गळफास…

गोव्यात उत्पल पर्रीकर यांचा पराभव ; भाजपाचे बाबुश मोन्सेरात विजयी

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज होत असून गोव्यातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री…
Navi Mumbai

Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण

Posted by - January 1, 2024 0
नवी मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही (Navi Mumbai)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *