shinde and thakre

Maharashtra Political Crisis : ‘हे’ 5 न्यायमूर्ती देणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल! जाणून घ्या त्यांच्याबद्दल

798 0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. सत्तासंघर्षाच्या कायदेशीर लढाईत 14 फेब्रुवारी ते 16 मार्च या काळात मॅरेथॉन सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केले होते.

या सत्ता संघर्षावर आता उद्या निर्णय येणार आहे. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसांत आपल्याला समजेल हे सरकार राहणार कि कोसळणार?. हा निकाल देणाऱ्या खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया पाच न्यायमूर्तींबाबत…

1. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)
धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर 2022 मध्ये शपथ घेतली. ते आधी अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि 2016 पासून सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यांनी दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून बी ए इकॉनॉमिक्स, त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. चंद्रचूड हे महाराष्ट्रीयन आहेत, त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड हेसुद्धा देशाचे सरन्यायाधीश होते.

2. न्यायमूर्ती एम आर शाह (Justice MR Shah)
न्या. एम आर शाह उर्फ मुकेशभाई रसिकलाल शाह हे मूळचे गुजरातमधील आहेत. 2005 मध्ये गुजरात हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 2018 मध्ये पाटणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि 2018 मध्येच त्यांची सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. ते आता येणाऱ्या 15 मे रोजी निवृत्त होत आहेत.

3. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी (Justice Krishna Murari)
न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांनी अलाहाबाह विद्यापीठातून एलएलबी करत त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात 22 वर्षे वकिली केली. 2005 मध्ये अलाहाबाद हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. यानंतर 2019 मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

4. न्यायमूर्ती हिमा कोहली (Justice Hima Kohli)
न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी दिल्ली विद्यापीठातून बी एचं शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातच एलएलबी केली. त्यांनी 1987 पासून वकिलीला सुरुवात, 1994 मध्ये कर्नाटक हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती. 31 ऑगस्ट 2021 पासून त्यांची सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.

5. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा (Justice PS Narasimha)
न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचा 1963 मध्ये हैदराबादमधल्या न्यायाधीश कुटुंबात जन्म झाला. सुरुवातीची काही वर्षे वकिली, 2008 पासून सुप्रीम कोर्टात सिनीयर अ‍ॅडव्होकेट म्हणून कार्यकाळ संभाळला. 2021 पासून त्यांना सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले.

Share This News

Related Post

#चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवड मतदार संघामध्ये 41.1 % मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते…

धक्कादायक : नव्यानेच शिंदे गटात प्रवेश केलेले निलेश माझीरे यांच्या पत्नीची आत्महत्या

Posted by - February 3, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वीच मनसे मधून बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केलेले निलेश माझेरे यांच्या पत्नीने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याने…
Blast

Indian Army : भारतीय लष्कराची जम्मू – काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 5 दहशतवादी ठार

Posted by - November 17, 2023 0
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने (Indian Army) मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी दहशतवादी ज्या ठिकाणी लपून बसले होते ते घर…

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प : पुणे-नाशिक अंतर गाठण शक्य होणार अवघ्या अडीच तासात – अमोल कोल्हे

Posted by - October 21, 2022 0
पुणे : पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी 2019 पासून पाठपुरावा करतोय. हा प्रकल्प देशातील रेल्वेसेवेत मोठी क्रांती घडवेल असे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन संपन्न

Posted by - September 2, 2022 0
पुणे : मुद्रांक विभागाने सुरू केलेल्या ॲप व अन्य ई- सुविधांचा नागरिकांना चांगला उपयोग होऊ शकेल. मुद्रांक विभागाचे कामकाज अधिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *