सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक, पण या निर्णयाचा आदर राखला जाईल का ? – ऍड प्रकाश आंबेडकर

227 0

पुणे – शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला जाईल का ? या बाबत शंका आहे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची तटस्थता जपली होती, त्यांच्यावर शींतोडे उडवले जाणार नाही याची दक्षता घेतली होती. परंतु निवडणूक आयोगाने स्वतःच्याच अधिकाराखाली Symbol Order 1968 जी काढली त्यामध्ये Section 15 प्रमाणे एखाद्या पक्षात जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हांला हस्तक्षेप करता येतो असे प्रावधान केले.

हे Symbol Order मधील section 15 संविधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला या निमित्ताने आली होती. परंतु दुर्दैवाने ती तपासणी झाली नाही आणि निवडणूक आयोगास शिवसेनेच्या प्रकरणात निर्णय घ्या असे सांगण्यात आले.

संविधानाने आणि संसदेने निवडणूक आयोगाची जी तटस्थता जपली होती दुर्दैवाने या निर्णयामुळे ती धोक्यात आली आहे. यापुढे पक्षातील विवादावर निवडणूक आयोग निर्णय घेणार हा जो संदेश या निर्णयातून गेला आहे तो चुकीचा आहे असे मी मानतो. निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो आहोत का? अशी दाट शक्यता निर्माण होते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन  करावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडी करत आहे.

Share This News

Related Post

BJP

Akola News : पोलिसांनी धिंड काढलेल्या ‘त्या’ गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - August 3, 2023 0
अकोला : राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेल्यास (Akola News) पवित्र होतात, अशी…
Poisoning

Poisoning : धक्कादायक ! सांगलीच्या आश्रमशाळेमध्ये जेवणातून 170 मुलांना विषबाधा

Posted by - August 28, 2023 0
सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी येथील आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा (Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे 170…

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे यशस्विनी सन्मान पुरस्कारांची घोषणा; बालगंधर्वमध्ये २२ जून रोजी संपन्न होणार पुरस्कार वितरण सोहळा

Posted by - June 12, 2022 0
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा…

#कसबा पोटनिवडणुक : कसब्याच्या एका तिकिटासाठी महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच

Posted by - January 30, 2023 0
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसाब पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.कसबा मतदारसंघाच्या…
ramesh jadhav

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार

Posted by - May 6, 2024 0
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला होता. ठाकरे गटाकडून माजी महापौर रमेश जाधव यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *