विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी ठरली होती; शिंदे गटातील नेत्याचं खबळबळजनक विधान

261 0

पुणे: राज्यात अभूतपूर्व सत्तांतर होऊन आता तीन महिने लोटल्यानंतर शिंदे गटातील एका नेत्याचा विधान चांगलंच चर्चेत आलं असून या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट केले होती, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच मी आघाडी सरकारच्या विरोधात उचल खाल्ली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि त्यांच्या मनात उठावाची बीज पेरलं, असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला.

नंदनवनमध्ये साडेचार तास चर्चा करताना मी एकनाथ शिंदे यांना सांगितलं हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा. प्रेशर करा हे तोडलं पाहिजे. भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

सासवड येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमांमध्ये बोलताना विजय शिवतारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलय

Share This News

Related Post

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांचा भाजपाला आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

Posted by - April 15, 2024 0
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.…

वीज प्रकल्पांना येणार गती ; वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

Posted by - October 12, 2022 0
मुंबई : अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

No Smoking Day 2023 : जर तुम्ही धूम्रपानामुळे त्रस्त असाल तर या सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात

Posted by - March 7, 2023 0
देशभरात दरवर्षी 2023 मार्च रोजी ‘नो स्मोकिंग डे’ साजरा केला जातो. धूम्रपानामुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागरूक करणे आणि या वाईट…

मोठी बातमी : नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

Posted by - November 30, 2022 0
मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने आज नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *