Thackeray Group

Thackeray Group : ठाकरे गटाला मोठा धक्का! आदित्य ठाकरेंचा ‘हा’ विश्वासू सोडणार साथ

752 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40आमदारांसह बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना (Thackeray Group) मोठा धक्का बसला होता. यानंतर अनेक नेते पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांची (Thackeray Group) साथ सोडली. अजूनदेखील उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर आउटगोईंग सुरू आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कनाल यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

Sharad Pawar : माझ्या राजकीय गुगलीवर फडणवीसांची विकेट गेली : शरद पवार

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचा (Thackeray Group) महत्वाचा कार्यक्रम असला की शिंदे गटाकडून ठाकरे गटातील पक्ष प्रवेश ठेवण्यात येत आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राहुल कनाल हे येत्या 1 जुलै रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मागच्या वर्षी राहुल कनाल यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडला होता. तेव्हापासून राहुल कनाल हे शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती.

Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव

कोण आहेत राहुल कनाल?
राहुल कनाल यांना उद्योजक म्हणून ओळखलं जातं. युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. त्याशिवाय, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना राहुल शिर्डी देवस्थान समितीवर सदस्य राहिले आहेत. कनाल हे मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते. त्याशिवाय शिक्षण समितीवरही त्यांची वर्णी लागली होती. राहुल कनाल यांनी कोरोना महासाथीच्या काळात रात्री अपरात्री लोकांना अन्नधान्य औषधं देण्याचे काम केले होते.

Share This News

Related Post

‘मराठी माथाडी कामगारांवर अन्याय जर होत असेल तर याद राखा..!’ निलेश माझिरे यांचा अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल इशारा

Posted by - November 9, 2022 0
पुणे : माथाडी कामगारांचे तीन वर्षापासून एका गोडाऊनने पेमेंट थांबवले आहे. माथाडी बोर्डाला वारंवार पत्रव्यवहार करून पण उत्तर मिळाले नाही.…
Hasan Mushrif

Ajit Pawar : उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर मुश्रीफांचा पलटवार

Posted by - November 12, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं.…
Manoj Jarange

Manoj Jarange : मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद नाही

Posted by - January 2, 2024 0
जालना : मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याला सुरुवात केली. या नोंदी शोधत असताना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये दाखल; थोड्याच वेळात जाहीर सभेला करणार संबोधित

Posted by - March 19, 2023 0
रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा होत असून सभास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Posted by - March 15, 2022 0
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *