प्रिय राज ठाकरे; खारघरच्या दुर्घटनेवरून सुषमा अंधारेंचं राज ठाकरे यांना खरमरीत पत्र म्हणाल्या…..

1493 0

मुंबई: ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 10 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता राज्यातील राजकारण देखील याच मुद्द्यावरून कापण्यास सुरुवात झाली आणि हाच धागा पकडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलंय.

सुषमा अंधारे यांचं पत्र अगदी जसंच्या तसं 

प्रति श्री राज ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सस्नेह जय महाराष्ट्र !

वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की, इंटरनेट आणि ई-मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी आपली अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे.

खारघर दुर्घटनेच्या संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना काल आपण व्यक्त झालात हे एका अर्थी बरे झाले..!

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावर कोणीही राजकारण करू नये असे आपले म्हणणेही अगदी समायोचित आहे. पण पुढे आपण कोरोना काळात हलगर्जीपणा झाला वगैरे वगैरे असे म्हणत उध्दव साहेबांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही भाषा केली.
आपण अत्यंत सिलेकटीव्ह पद्धतीने व्यक्त झाला त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवतात आणि ते विचारलेच पाहिजेत असे वाटते .

दादा,
( हे संबोधन दहशतीवाला दादा या अर्थाने नाही तर मोठा भाऊ या अर्थाने वापरले आहे)
मुद्दा क्रमांक एक :
कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच.
पण खारघर मध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी.

मुद्दा क्रमांक दोन : भारतरत्न सारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले गेले नव्हते?

मुद्दा क्रमांक तीन : श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला.
तर याचे राजकारण करू नका असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते.

मुद्दा क्रमांक चार : कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खाजगी पीएम केअर फंड मध्ये निधी द्या असे म्हणणारे श्री देवेंद्र फडणवीसजी कोरोना काळात राजकारण करत नव्हते का ?

मुद्दा क्रमांक सहा : गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असताना सुद्धा मंदिरे उघडलेच गेले पाहिजेत यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून करून राज्यातली एकूण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजपाई नेते राजकारण करत नव्हते का ?

मुद्दा क्रमांक सात : सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती वारी बंद होती तशी आंबेडकर जयंती सुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना एवढ्या गंभीर काळामध्ये सहकार्य करायचे सोडून त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का ?

असू द्या दादा मी आपल्याला फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही.

पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आपल्या पक्षातल्या देशपांडे नावाच्या एका कार्यकर्त्याला साधे खरचटलेही नव्हते तरी सुद्धा आपण काय तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. बापरे , आपली ती शून्यात हरवलेली नजर माध्यमे वारंवार दाखवत होते.
दादा , खारघरच्या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकाला आपण असेच धावतपळत भेटायला गेलात का नाही ?

शेवटचा मुद्दा: कोरोना काळामध्ये माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल फक्त भारतात नाही तर जगभरात घेतली गेली आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना कामगिरीचे कौतुक केले. “धारावी पॅटर्न” तर जगभर गाजला.
या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेश मध्ये मात्र गंगा नदीवर प्रेतं तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे कोरोनाचा फैलाव उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रमाणात झाला. हा हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्य यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण काही सुतोवाच करणार आहात का ?

असो , आपल्या मनात नसला तरी बहीण म्हणून माझ्या मनात कायमच स्नेहभाव आहे वृद्धिगंत व्हावा.

आपली बहीण
सुषमा अंधारे

 

Share This News

Related Post

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची दुसरी बैठक संपन्न

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : इतरमागास वर्ग समाजातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात असे सांगतानाच प्रत्येक जिल्ह्यात…

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन (व्हिडिओ)

Posted by - January 27, 2022 0
पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या…
Maharashtra Weather

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : मान्सूनबद्दल हवामान खात्याने धडकी भरवणारा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, हवामान विभागानं दिलेल्या…

“मुक्ताताई टिळक म्हणजे आदर्श कार्यकर्त्याचा वस्तूपाठ; पुण्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान…!” – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

Posted by - December 22, 2022 0
पुणे : कसबा मतदारसंघाच्या भाजपा आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात शोकसंवेदना…

पुण्यातील ससून रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Posted by - April 6, 2023 0
पुण्यातील ससून रुग्णालयावर लाचलुचपत विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात तपास अधिकारी पोहचले असून दुपारपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *