Surekha-Punekar

Surekha Punekar Join BRS : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत BRS मध्ये केला प्रवेश

472 0

पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश (Surekha Punekar Join BRS) केला आहे. त्यांनी सष्टेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी (NCP) पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशावरून भाजपने (BJP) मोठ्या प्रमाणात टीका केली होती. सुरेखा पुणेकर यांनी तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao) यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी भारत राष्ट्र समितीत प्रवेश (Surekha Punekar Join BRS) केला. सष्टेंबर 2021 मध्ये त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या पक्षप्रवेशावरून भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार टीका केली होती.

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहूल हंडोरेला मुंबईतून अटक

काय म्हणाले होते प्रविण दरेकर ?
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी एका जाहीर सभेत सुरेखा पुणेकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे’, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीने दरेकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

सुरेखा पुणेकरांनी खास शैलीत दिले होते प्रत्युत्तर
प्रविण दरेकरांना सुरेखा पुणेकरांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं होते. “घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय,” असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला होता.

Share This News

Related Post

मोठी बातमी! माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी

Posted by - October 22, 2022 0
बीड: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार…

माळुंगा गावाला तातडीची मदत ; पुणे महापालिकेची तातडीची मदत

Posted by - July 13, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित…
Jalgaon News

Jalgaon News : म्हशींना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले; अन् लेकरांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हळहळलं

Posted by - September 25, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये म्हशींना पाणी पाजण्यासाठी जात असताना अचानक बोरी नदीला…
Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! तरुणी लहान भावाची तक्रार मोठ्या भावाकडे करायला गेली अन्…

Posted by - November 29, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात मागच्या काही दिवसांपासून…

मोठी बातमी ! ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार

Posted by - May 20, 2022 0
वाराणसी- ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आला आहे. आता जिल्हा न्यायाधीश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *