Supriya Sule

Supriya Sule : महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी खा. सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

1000 0

पुणे : महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या विषयावर चर्चेसाठी वेळ मिळायला हवा, अशी मागणी केली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची बहुमतातील सत्ता असूनसुद्धा या समाजघटकांचे आरक्षणाचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. परिणामी त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे, ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात तरुणांच्या आत्महत्या होत आहेत.‌ ही उद्वेगजनक परिस्थिती आहे, असे सांगत आरक्षणाचे हे विषय सभागृहात मांडले जाऊन ते मंजूर होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत आरक्षणाचा विषय मांडून त्यावर चर्चा करावी. यासाठी अध्यक्षांनी आगामी अधिवेशनात यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Kishori Pednekar

Kishori Pednekar : डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांचा पासपोर्ट EOW कडून जप्त

Posted by - September 16, 2023 0
मुंबई : सध्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोविड काळातील कथित डेड बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात…

#PUNE : चांदणी चौकात वाहतूक कोंडी मोडीत काढली पण पादचाऱ्यांचं काय ? पादचाऱ्यांचा रोज होतोय जीवघेणा प्रवास

Posted by - February 16, 2023 0
पुणे : शहरातील पश्चिम भागातील महत्त्वाचा असलेल्या चांदणी चौक मध्ये वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून चांदणी चौकातील बावधन ते कोथरूड, व…

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन

Posted by - September 19, 2022 0
पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कालावधीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच…
Pune News

Pune News : पुण्यातील माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Posted by - October 28, 2023 0
पुणे : मराठा आरक्षणावरून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण पेटले आहे. लोक आरक्षणापायी आत्महत्या करताना दिसत आहेत. आता याच आरक्षणावरून पुण्यामध्ये…

“तुमची हिम्मत कशी झाली माझा फोन रेकॉर्ड करण्याची…” खासदार नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा ; पहा व्हिडिओ

Posted by - September 7, 2022 0
अमरावती : खासदार नवनीत राणा आज अमरावतीच्या पोलिसांवर चांगल्याच कडाडल्या आहेत. विषय होता लव्ह जिहाद प्रकरणातून एका मुलीचं झालेलं अपहरण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *