Supriya Sule

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

421 0

पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. येत्या 17 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना हा पुरस्कार दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. चालू सतराव्या लोकसभेत सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून 5 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत त्यांनी 94 टक्के उपस्थिती लावत 231 चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात त्यांनी आतापर्यंत 587 प्रश्न विचारले असून 16 खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सात वेळा प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

गत सोळाव्या लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात 96 टक्के उपस्थिती लावत 152 चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण 1186 प्रश्न उपस्थित केले, तर 22 खासगी विधेयके मांडली आहेत. ज्युरी कमिटीचे चेअरमन व केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सह चेअरमन व भारतीय निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस कृष्णमूर्ती यांनी सुळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. खासदार सुळे यांची संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहीताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.

पुरस्कार म्हणजे कामाला मिळालेली पावती – खासदार सुळे यांची भावना
प्राईम पॉईंट फौंडेशन, चेन्नई यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दर पाच वर्षांनी देण्यात येणाऱ्या विशेष संसद महारत्न पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली असून बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला लोकसभेत निवडून पाठविले तो सार्थ ठरविण्यासाठी आपण सदैव कार्यरत आहे, अशा शब्दात खासदार सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा पुरस्कार आपल्या कामाला मिळालेली पावती आहे. अर्थात हे यश माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचे आहे. म्हणूनच हा पुरस्कार मतदारसंघातील जनतेला कृतज्ञतापूर्वक अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा पुरस्कार 17 व्या लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येत आहे. यापुर्वीही 16 व्या लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी देखील हाच पुरस्कार मिळाला होता, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Related Post

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 4, 2024 0
पुणे : पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने भारताच्या दक्षिण भागातून बंट्स समाजाबांधव म्हणजे ज्यांना ‘पुणेकर आण्णा’ म्हणून…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार

Posted by - May 19, 2024 0
पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या…

‘अरे मी तर तुझाच मावळा’ ; शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

Posted by - April 7, 2022 0
पुणे- मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात…

माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, चंद्रकांत पाटील यांना इशारा

Posted by - May 27, 2022 0
पुणे – खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *