Sunil Kedar

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

634 0

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणाचा निकाल लागला आहे. यामध्ये राज्याचे माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) हे दोषी आढळले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. 2001-02 दरम्यान हा घोटाळा झाला होता. त्यावेळी सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात न्यायालयात खटला सुरु होता. यासंदर्भात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी निकाल दिला आहे.

सुनावणीवेळी 8 आरोपी कोर्टात हजर होते. यावेळी निर्णय देताना कोर्टाने तत्कालीन बँक अध्यक्ष सुनील केदार, मुख्य रोखे दलाला केतन शेठ, तत्कालीन बॅंक मॅनेजर अशोक चौधरी या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी मानले आहे. तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केले आहे.

काय आहे नेमका हा बँक घोटाळा?
मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद इथल्या काही कंपन्यांनी बँकेच्या रकमेतून 150 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही तसंच बँकेची रक्कमही परत केली नाही. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002ला न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं गेलं. तेव्हापासून हा खटला प्रलंबित आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी 30 नोव्हेंबरपर्यंत निकाल द्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होतं. मात्र काही कारणास्तव निकाल पुढे ढकलण्यात आला. अखेर आज 22 डिसेंबर रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Nashik Video : हातात तलवार घेऊन गुंडाचा झेरॉक्स दुकानावर हल्ला; नाशिकमधील घटना

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड

Share This News

Related Post

Dhule Bus Accident

Chandrapur News : गौतमी पाटीलचा कार्यक्रम पहायला जाणे पडले महागात ! घरी परतत असताना नियतीने साधला डाव अन् ….

Posted by - October 22, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून (Chandrapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गौतमी पाटील या नावाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या तरुण…
Nanded Loksabha

Nanded Loksabha : नांदेडमधल्या मतदानाला लागलं गालबोट; तरुणाने थेट कुऱ्हाडीने EVM फोडलं

Posted by - April 26, 2024 0
नांदेड : आज देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Nanded Loksabha) दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात…

‘बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते…. ‘, शरद पवार यांनी उघड केले महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचे गुपित

Posted by - June 4, 2022 0
पुणे – महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता. जेंव्हा राजकीय क्रायसिस निर्माण होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी…
Yavatmal News

Yavatmal News : शेतात आलेल्या महावितरणच्या अभियंत्याला शेतकऱ्याकडून मारहाण

Posted by - November 17, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतकऱ्यानं वीज वितरणच्या सहाय्यक अभियंत्याला बेदम मारहाण केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *