Sudhir More

Sudhir More : मुंबई हादरली ! उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक सुधीर मोरेंची धावत्या लोकलखाली आत्महत्या

629 0

मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काय घडले नेमके?
रेल्वे रुळावर गुरुवार (31 ऑगस्ट) रात्री सुधीर मोरे यांचा मृतदेह सापडला. रात्री त्यांना एक फोन आला आणि मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे असं त्यांनी आपल्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं आणि ते घाईत घराबाहेर पडले. त्यांनी बॉडीगार्डला आपल्यासोबत नेलं नव्हतं. गाडी न घेता रिक्षाने गेले. मात्र घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे साडे अकराच्या दरम्यान रुळावर झोपले. कल्याणवरुन मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या (Local Train) मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या केल्याचा निकटवर्तीयांचा दावा
गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतं आहे. दोन महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॅार्ड करण्यासाठी त्यांनी एक नवीन मोबाईल फोन देखील घेतला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा अशी विनंती सुधीर मोरेंच्या जवळच्या लोकांनी केली आहे.

सुधीर मोरे यांची राजकीय कारकीर्द
सुधीर मोरे हे कट्टर ठाकरे समर्थक होते. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. सुधीर मोरे हे मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईट इथले शिवसेनेचे नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते. त्यांची वहिनी देखील माजी नगरसेवक होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Share This News

Related Post

Special Report : सावधान ! सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग कराल तर सेक्सटॉर्शनचे व्हाल शिकार

Posted by - December 24, 2022 0
अनोळखी मेसेजेस, व्हिडिओ कॉल येत असतील तर सावधान… तुम्ही सेक्सटॉर्शनचे शिकार होऊ शकता. हल्ली तरुण-तरुणींपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या मायाजालात…
Rais Shaikh

Rais Shaikh : भिवंडीमध्ये नवे वळण! आमदार रईस शेख यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Posted by - April 20, 2024 0
भिवंडी : सध्या लोकसभा निवडणुकीचे राजकारण तापलेले असताना भिवंडीमधील राजकारणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. या ठिकाणी भिवंडी पूर्व विधानसभेचे…

25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो; प्रकरण पोहोचले पोलीस स्टेशन पर्यंत, वाचा सविस्तर

Posted by - October 28, 2022 0
महाराष्ट्र : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी चलनी नोटांवर…

Pune Accidents : हॅन्ड ब्रेक लावायला विसरला चालक : ट्रॅक्टरने दिली 6 वाहनांना धडक

Posted by - July 16, 2022 0
पुणे : बिबवेवाडी मध्ये एक विचित्र अपघाताने खळबळ उडाली आहे. अप्पर जुना बस स्टॉप भागामध्ये एक ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर…

नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

Posted by - February 21, 2022 0
पिंपरी- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *