Sudha Murty

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

427 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तीं (Sudha Murty) यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांचे अभिनंदन केले आहे.

काय लिहिले आहे ट्विटमध्ये?
समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधाजींचे योगदान मोठे आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या ‘नारी शक्ती’चा एक शक्तिशाली पुरावा आहे, जी आपल्या देशाचे भवितव्य घडविण्यात महिलांचे सामर्थ्य आणि क्षमतेचे उदाहरण देते. त्यांना राज्यसभा कार्यकाळ फलदायी व्हावा, यासाठी शुभेच्छा,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जाणून घेऊया सुधा मूर्तीं यांच्या कार्याबद्दल
सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील हावेरी येथील शिगगाव येथे एका कन्नड भाषिक कुटुंबात झाला. मूर्ती यांच्या वडिलांचे नाव आर.एच. कुलकर्णी होते. कुलकर्णी हे सर्जन होते तर मूर्ती यांची आई विमला कुलकर्णी या शालेय शिक्षिका होत्या. सुधा मूर्ती या ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या माजी अध्यक्षा आहेत. गेट्स फाऊंडेशनच्या पब्लिक हेल्थकेअर इनिशिएटिव्ह्सच्या त्या सदस्य आहेत. मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठात ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ची स्थापना केली आहे.

‘या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
सुधा मूर्ती यांना केंद्र सरकारने 2006 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर 2023 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या देशातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सुधा मूर्तींनी लिहिलेली पुस्तके
सुधा मूर्ती यांनी कन्नड भाषेत लिहिलेली ‘डॉलर बहू’ ही कादंबरी लोकप्रिय झाली होती. नंतर या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद झाला होता. 2001 मध्ये ‘झी टीव्ही’ने या कादंबरीवर आधारित हिंदी मालिकेची निर्मिती केली होती. सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या ‘ऋण’ या कथेवर मराठीमध्ये ‘पितृऋण’ नावाचा चित्रपट तयार करण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Buldhana Accident : वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Sharad Pawar

शरद पवार गट हे निवडणूक चिन्ह घेण्याची शक्यता

Posted by - February 6, 2024 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शरद पवार…

मराठवाडा शिक्षक मतदार संघातून भाजपाकडून किरण पाटील यांना उमेदवारी

Posted by - October 22, 2022 0
राज्यात नागपूर शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, नाशिक आणि अकोला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकांसाठी…

संजय राऊत वैफल्यग्रस्त व्यक्ती ; त्यांना काही काम धंदे नाहीत – देवेंद्र फडणवीस

Posted by - April 17, 2022 0
रामनवमीपासूनदेशातील अनेक भागात जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारावरुन विरोधक भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत…

पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारांना किती खोके मिळाले होते ? प्रकरणाला आता वेगळे वळण ,वाचा विजय शिवतारे काय म्हणाले…

Posted by - November 8, 2022 0
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अवमानकारक शिवीगाळ केल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांना विरोधी पक्षच नाही तर स्व-पक्षातून देखील…
Nana Patole

नाना पटोलेंना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची हायकमांडकडे मागणी

Posted by - May 26, 2023 0
नागपूर : पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काही नेत्यांमध्ये अंतर्गत वाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *