Chandrakant Patil : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंतची फी भरणार

265 0

मुंबई : कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणताही) तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल. तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत फी सरकारच्या वतीने भरली जाईल त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना दिली.

कोरोनामुळे ज्यांनी आई-वडील दोघांनाही गमावले आहे अशा विद्यार्थ्यांची चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांची फी ही राज्य सरकारतर्फे भरण्यात येईल. यासाठी… | By Chandrakant Patil | Facebook

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली. याबाबत विधानसभा सदस्य शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ९३१ पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, २०० पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि २२८ पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना २ कोटी ७६ लाख ८४ हजार २२२ रक्कम वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री श्री.पाटील यांनी विधानसभेत दिली.

Share This News

Related Post

Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Posted by - March 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित…

महामेट्रोकडून पुण्यात नवीन सात मार्ग प्रस्तावित, कोणते आहेत हे नवीन मार्ग ?

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘ सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटर…

पुणेकरांनो ! गुरुवारी ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - October 11, 2022 0
पुणे : पुणे शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद असणारे भाग ; …

जळगावमध्ये सैराट : रक्षाबंधनाच्या 2 दिवसानंतर भावानेच दाबला बहिणीचा गळा ; प्रियकराची गोळ्या झाडून हत्या

Posted by - August 13, 2022 0
जळगाव ( चोपडा ) : जळगाव मध्ये झालेल्या हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली आहे . सख्या भावानेच बहिणीचा गळा दाबून खून…

युक्रेनमध्ये अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन

Posted by - February 25, 2022 0
पुणे- युक्रेनमध्ये १८ हजारहून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणि नोकरीसाठी तिथं वास्तव्यास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *