MAHARASHTRA POLITICS : तरुणांना सोबत घेण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ ; राष्ट्रवादी आघाडीवर

174 0

मुंबई – राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून राज्यातील प्रमुख पक्षाने तरुण वर्गाकडे आपला मोर्चा वळवला आहे. अधिकाधिक तरुण आपल्या पक्षासोबत जोडला जावा यासाठी सर्वच पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. तरुणांना सक्रिय राजकारणात आणून पक्षाच्या भूमिकेशी आणि विचारांशी एकनिष्ठ होऊ समाजसेवा करण्यासाठी 18 वयोगटाच्या वरील तरुणांना आपल्या पक्षात आणण्यासाठी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि या सोबतच शिवसेना अशा सर्वच पक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम आपल्या हाती घेतले आहेत.

राष्ट्रवादीकडून तरुणांच्या नियुक्त्या सुरू  : गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या कार्य अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक केली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडूनही मुंबई विभाग विद्यार्थी संघटनेच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. तरुणांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने पाऊल पुढे टाकले असून राजकारणातील तरुणांचा असलेले महत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलंच माहित आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अधिकाअधिक राज्यातला तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत उभा राहिला पाहिजे यासाठी शरद पवार यांनी अनेक कार्यक्रम घेण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जवळपास 50 टक्के जागा यात तरुण नेतृत्वासाठी ठेवाव्यात अशा सूचना खुद्द शरद पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या आहेत. तर, विधानसभा निवडणुकीत देखील अधिकाधिक तरुणांना संधी मिळेल अशाप्रकारे तिकीट वाटप केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तरुणांना 50% संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तरुण नेतृत्वाची चाचपणी देखील सुरू झाली आहे.

राज्यातील तरुण जास्तीत जास्त आपल्या पक्षाशी जोडला जावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरात कार्यक्रम आखायला सुरुवात केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून ” शरद युवा यात्रा” या कार्यक्रमांतर्गत राज्यभरातील करून सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवार यांचे राजकारणातील योगदान त्या योगदानाचा महाराष्ट्रासाठी असलेले महत्त्व हे पटवून देण्याचा काम सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजकारणात येणाऱ्या नवतरुणांना करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसकडून राबविण्यात येत आहे.

राज्य घरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून “क्रीडा महोत्सव” भरवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील तरुण खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम करण्यात आले. राज्यभरातील तरुण खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी तरुणांना पक्षाची जोडण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून “सुपर 100″ हा कार्यक्रम देखील तरुणांसाठी राबविण्यात येतोय. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पडले असलेल्या शंभर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा कार्यक्रम राबवला जातो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकी या शंभर जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जिंकून यावा यासाठी त्या जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोडण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. जेणेकरून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल.

अशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना डोळ्यासमोर ठेवून अनेक कार्यक्रम पक्षाच्या मार्फत राबवले जात आहे. तसेच तो तरुण पक्षामध्ये केवळ कार्यकर्ता बनून राहू नये यासाठी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील किंवा मग विधानसभा निवडणुका असतील या सर्व निवडणुकांमध्ये त्या तरुणाला संधी मिळेल यासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रयत्न केले जात आहेत.

भारतीय जनता पक्षाने ही नेहमीच तरुणांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. प्रत्येक निवडणुकांमध्ये अधिकाधिक तरुण भारतीय जनता पक्षाशी जोडला जावा यासाठी अनेक कार्यक्रम पक्षाच्या मार्फत राबवले जातात. आता राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यामुळे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या असलेल्या तरुणांसाठी तमाम योजना तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा कडून आखले जात आहे. भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यावर राज्यातील तरुणांना पक्षाची जोडण्याची जबाबदारी टाकण्यात आली असून यासाठी युवा मोर्चाच्या अंतर्गत अनेक कार्यक्रम भारतीय जनता पक्ष राबवत आहे.

राजकारणाच्या मुख्य प्रवाहात 18 वर्षे वयोगटातील च्या वरील तरुणांना आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात असून, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक तरुणांना संधी देण्यासाठी पक्ष प्रयत्न करणार असल्याचे विक्रांत पाटील म्हणत आहेत. आतापर्यंत अधिकाधिक तरुणांना संधी देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला ओळखल आहे. प्रत्येक वेळीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असोत किंवा विधानसभा निवडणुका असोत. या निवडणुकांमध्ये राजकारणाचा अनुभव असलेले नेतेमंडळी आणि राजकारणात उदयन्मुख होणारी तरुण मंडळी यांची सांगड घालत उमेदवार दिले जातात.

आतापर्यंत नेहमीच अशा निवडणुकांमध्ये जवळपास 35 ते 40 टक्के तरुण नेतेमंडळींना स्थान देण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केला आहे. यापुढे जवळपास 40 टक्के तरुण होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून दिले जातील, अशी शक्यता विक्रांत पाटील यांनी वर्तवली आहे. मात्र, कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी देणे आधी त्याच्या निवडून येण्याची क्षमता ही भारतीय जनता पक्षात तपासली जाते आणि त्या आधारावरच तिकीट दिले जाते याचाही आवर्जून उल्लेख विक्रांत पाटील यांनी केला आहे.

अधिकाधिक तरुणांनी आपल्या पक्षासोबत उभारावे, आपल्या पक्षाची विचारधारा आत्मसात करावी यासाठी भारतीय जनता पक्ष राज्यभरात अनेक कार्यक्रम राबवत आहे. यापैकी 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी ” युवा वॉरियर” हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर राबविण्यात येतोय. कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आणून भारतीय जनता पक्षाची जोडण्याचं काम भाजप युवा मोर्चा करत आहे.

अखिल भारतीय जनता पक्षाकडून राबवला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून राजकीय पार्श्वभूमी असलेला तरुण भारतीय जनता पक्षाची जोडला गेला पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या सहा महिन्यापासून या अभियानाची सुरुवात झाली असून आतापर्यंत राज्यभरात अशा तीन हजार शाखा भारतीय जनता पक्षाने स्थापन केल्या असून या शाखेच्या माध्यमातून राजकीय पार्श्वभूमी असलेला तरुण जोडण्याचं काम सुरू झाल आहे. तसेच विद्यार्थी आणि तरुण यांच्या अनेक समस्या लक्षात घेऊन त्याबाबत आक्रमकतेने प्रश्न उपस्थित करून ते मार्गी लावण्याचा काम युवा मोर्चा कडून सुरू असल्याचं भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितला आहे.

सध्या शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे. मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि युवा सेनेमध्ये फुट पडली आहे. युवकांना शिवसेनेसोबत जोडण्यासाठी युवासेना राज्यभर काम करते. मात्र, सध्या शिवसेनेत असलेल्या राजकीय वादंग यामुळे पक्षाची सर्व अभियान आणि कार्यक्रम थांबलेले आहेत. मात्र, हे वादळ उठण्याआधी युवा सेनेकडून राज्यात अनेक ठिकाणी तरुणांसाठी मेळावे भरवण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न खुद्द आदित्य ठाकरे हे करत होते.साडेचारलाख तरुण युवा सेनेशी जोडले – युवा सेनेचे अध्यक्ष वरून सरदेसाई यांनीही राज्यभरात अनेक ठिकाणी दौरे करत तरुणांना शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. तसेच, नेहमीच शिवसेनेने तरुणांना निवडणुकांमध्ये संधी देताना हात आखडता ठेवला असल्याचा आरोप केला जातो. मात्र, या वेळेस होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी देत जवळपास 35 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत तरुण उमेदवार शिवसेनेकडून दिले जाणार आहेत. तसेच, युवा सेनेच्या माध्यमातून राज्यभरात साडेचारलाख तरुण युवा सेनेशी जोडले गेले आहेत.

युवासेना सोबत विद्यार्थी जोडला जावा यासाठी राज्यभरात युवासेना इकडून सीईटी परीक्षाची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. तसेच, दहावी परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स देखील करण्याचे कार्यक्रम आयोजले जातात. राज्यातील विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम घेतला जातो.खेळ समिटचे आयोजन- युवा सेनेच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणण्यासाठी खेळ समिटचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कबड्डी, बॉक्सिंग क्रिकेट फुटबॉल सारखे 11 खेळ खेळवले जातात. यातून राज्यात खेळाडू घडवण्यासाठी युवा सेनेकडून प्रयत्न सुरू आहेत.

तरुणांमधील स्किल डेव्हलपमेंट व्हावे यासाठी “युवा स्किन” कार्यक्रम राज्यभर युवा सेनेच्या माध्यमातून राबवले जातात. त्यातून तरुणाच्या अंगात असलेल्या स्कीम व्यवसायिक दृष्ट्या परिपक्व करण्याचा प्रयत्न यातून केला जातो.

Share This News

Related Post

Vasant More

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Posted by - March 12, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून (Vasant More) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती, महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान,…
Eknath And Uddhav

ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ दोन शिलेदारांचा शिंदे गटात प्रवेश

Posted by - June 3, 2023 0
मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे…

शरद पवार निर्णय बदलणार? विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ‘ही’ महत्त्वाची महिती

Posted by - May 2, 2023 0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले असून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना…
shinde and uddhav

बाकी चुकलं पण सरकार वाचलं !

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड,…
Ajit Pawar

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले ‘थोडी कळ सोसा…’

Posted by - February 11, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *