पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

365 0

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्याi सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, मुनाफ हकिम, जो. जो. थॉमस, श्रीरंग बरगे, राजाराम देशमुख, गजानन देसाई आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

प्रजासत्ताक दिन विशेष : देशाच्या राज्यघटनेची पहिली प्रत कुठे छापण्यात आली माहित आहे का ? वाढवा तुमचे सामान्य ज्ञान

Posted by - January 25, 2023 0
डेहराडून : देशात यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा…
Ajit Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Posted by - December 1, 2023 0
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. देशासह राज्यातील प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सध्याची…

पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना ! हॉरर सिनेमाने घेतला ८ वर्षाच्या मुलाचा बळी

Posted by - June 1, 2022 0
पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइलवर हॉरर फिल्म पाहण्याची सवय असणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाने स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून…
Disater Alert

Disaster Alert : प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल कंपन्यांना आदेश

Posted by - July 20, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतासह जगभरातच नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोबाईल फोनबद्दल महत्त्वाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *