Ram Satpute

SPECIAL REPORT : राम सातपुते Vs प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा महासंग्राम

393 0

सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठीची उमेदवारी जाहीर होताच मतदारसंघांमध्ये महासंग्राम सुरु झाला आहे. राज्यातील महत्वाच्या जागांपैकी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. सोलापुरात हायव्होल्टेज निवडणूक पाहायला मिळणार असून काँग्रेसने सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेना उमेदवारी घोषित केली तर दुसरीकडे भाजपने देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आमदार विरुद्ध आमदार असा महासंग्राम रंगणार आहे.

सोलापूर मतदारसंघाचा इतिहास?
1952 साली तयार झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षांचा अपवाद वगळण्यात आला तर काँग्रेसचा गड कायम राहिला आहे. 2014 च्या मोदी सरकारामुळे देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला असून सोलापुरात देखील तेच घडले. त्या कारणामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला गमावलेला हा गड परत मिळवण्याचा पर्याय असून दुसरीकडे भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. .

कसा आहे प्रणिती शिंदेंचा राजकीय प्रवास?
आमदार प्रणिती शिंदेनी जाई-जुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात करून 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या. तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेनी केला. 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही. त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेनी विजयश्री खेचून आणला. सलग तीन वेळा आमदार राहिल्याने सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदेचा चांगला दबदबा आहे. तर प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगलेच बळ देखील दिले आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदेना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.

कसा आहे राम सातपुतेंचा राजकीय प्रवास?
राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार असून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ऊसतोड कामगारांचा मुलगा ते आमदार असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात करताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी राम सातपुते यांची ओळख असल्यामुळे राम सातपुते नवखे असले तरी माळशिरस मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी अनेक दिग्गजानी परिश्रम घेतलेले होते.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले आहेत. यातील अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, पंढरपूर या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर दुसरीकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी अजित पवार गटात गेल्याने महायुतीची ताकद भरभक्कम झाली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत.

कोण मारणार बाजी?
दोन्ही उमेदवार तरुण नेतृत्व आहेत. आक्रमक वक्तृत्व शैली असल्याने उमेदवारी जाहीर होताच आरोप-प्रत्यरोप सुरु व्हायला वेळ नाही लागला. मात्र उमेदवारची वैयक्तिक ताकद, पक्षीय बलाबल, जातीय समीकरण हे सर्व पाहता निवडणुकीत बाजी कोण मारणार हे आपल्याला 4 जून रोजीच कळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Govinda : गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

IPL 2024 : RR Vs DC मध्ये कोणाचे पारडे आहे जड?

SBI चा ग्राहकांना मोठा झटका! डेबिट कार्ड संदर्भातील ‘हा’ नियम 1 एप्रिलपासून होणार लागू

Shivsena : अखेर एकनाथ शिंदेंच्या 11 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

अहमदनगरमधील घोडेगाव येथे राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

Posted by - April 30, 2022 0
अहमदनगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला सभेसाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. अहमदनगरमधील घोडेगावजवळ हा अपघात…

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, 13 मे पर्यंत कोठडीतच

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुक्काम आणखी काही दिवस कोठडीतच असणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुख यांच्या कोठडीत…

9 नोव्हेंबर रोजी पुणे येथे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Posted by - November 7, 2022 0
पुणे : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी २०२३ या…

दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार ? मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : दसरा मेळावा यावरून शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने अर्ज करण्यात आले होते. एखाद्या मैदानावर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी…

ब्रेकिंग न्यूज ! आता नवाब मलिकांच्या घरावर ईडी धडकली ! पहाटेच ईडी अधिकाऱ्यांची कारवाई

Posted by - February 23, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीमधील एकेक मंत्र्यावर, नेत्यांवर इडीची कारवाई झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नंबर लागला आहे. मलिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *