Shivsena

Shivsena : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी

619 0

मुंबई : शिवसेनेच्या आमदार (Shivsena) अपात्रतेप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये 14 सप्टेंबरला आमदारांच्या अपात्रतेबाबत मॅरेथॉन सुनावणी पार पडणार आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी घेणार आहेत, त्यामुळे शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखाली येणार आहेत.

यावेळी वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. यानंतर प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे, त्यावेळी संबंधित आमदारांना बोलावलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदारांना आपलं म्हणणं मांडायला संधी मिळणार आहे. मग पुढे आमदार आपले पुरावे सादर करतील, तसंच एकमेकांना पुराव्याचे पेपरही देतील. यानंतर विधिमंडळ सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर याचिकेचं वेगळं इश्यू फ्रेम करेल.

विधानभवनात 14 सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार असून प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने निकालामध्ये विधिमंडळातील शिवसेना पक्ष कोण? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांची सुनावणी घेणार आहेत.

Share This News

Related Post

Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing) यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास फेसबूक लाईव्ह सुरु असताना…
Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

Posted by - September 12, 2023 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये शेतात गेलेल्या बाप लेकांचा तडफडून मृत्यू…
Gondia News

Gondia News : गोंदिया हादरलं! विद्युत मोटर विहिरीत सोडताना शॉक लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 28, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Gondia News) विहिरीमध्ये पाण्याची मोटर टाकत…

‘अग्निपथ’च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने- चंद्रकांत पाटील

Posted by - June 18, 2022 0
पुणे- लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार…

मुंबई : मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

Posted by - November 21, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *