Maharashtra Politics : निवडणूक आयोगापुढील सुनावणीस शिवसेनेचा आक्षेप ; सर्वोच्च न्यायालयात आज नवी याचिका

141 0

नवी दिल्ली : शिवसेनेत वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आह़े . निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहे.

शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या वतीने केलेल्या रीट याचिकेशी हा अर्ज संलग्न केला जाणार आहे. हा अर्ज सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार होता. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीसाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण सोमवारी संसद भवनात असल्यामुळे हा अर्ज मंगळवारी दाखल केला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची अपात्रता व त्यासंबंधित याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

अपात्रतेसंदर्भात कोणतीही कारवाई न करता स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणती आणि निवडणूक चिन्हावर कोणाचा अधिकार, या मुद्दय़ांवर सुनावणी घेणे योग्य नसल्याचा मुद्दा शिवसेनेच्या वतीने याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी तसेच, लोकसभेतील १२ खासदारांनी बंडखोरी केली आहे. मात्र, ही बंडखोरी नसून, आमचा पक्ष खरी शिवसेना आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गट आणि भाजप युती सरकारला शपथही दिली आहे. लोकसभाध्यक्षांनीही १२ खासदारांच्या बहुमताच्या पाठिंब्यावर गटनेता बदलण्यासही मान्यता दिली आणि विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत निवडणूक चिन्हावर हक्क सांगितला.

स्थगितीची मागणी

पक्ष संघटनेतील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला दिले आहेत़ मात्र, अशा पद्धतीने कागदपत्रांची मागणी करणे हा न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा भंग होतो, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कृतीची दखल घेऊन सुनावणी स्थगित करावी, अशी शिवसेनेची मागणी आह़े

Share This News

Related Post

NCP

राज्याच्या राजकारणात किंगमेकर ठरलेल्या राष्ट्रवादीची ‘अशी’ झाली स्थापना

Posted by - June 10, 2023 0
10 जून 1999 राज्याच्या राजकारणातील मोठा दिवस याच एका राजकीय पक्षाचा उदय राजकीय पटलावर झाला हा राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी…

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी संभाजी ब्रिगेडची रणनीती ; मराठा सेवा संघात मोठे बदल

Posted by - September 1, 2022 0
मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप आणि शिंदे सरकार स्थापन झाले . आता 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच…

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांना मातृशोक

Posted by - July 13, 2022 0
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या…

Decision of Cabinet meeting : ग्रामीण भागात भूमीहीन लाभार्थींना जागा देण्याबाबत निर्णय

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या…
Shivsena

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *