MLA Disqualification

MLA Disqualification : शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

627 0

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यत्र राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) कारवाईला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य 16 आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर येत्या 25 सप्टेंबरला अंतिम फैसला होणार असल्याचे समजत आहे. एका आठवड्यात सुनावणी पूर्ण करून त्याचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या सुनावणीत राहुल नार्वेकर हे अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून काम करतील, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळं आता येत्या 25 सप्टेंबरला होणाऱ्या सुनाणीत राहुल नार्वेकर हे काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार अपात्र झाल्यास एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार हे मात्र नक्की.

जर असे घडले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो. या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि नितीन गडकरी यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळं आता येत्या 25 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर या कालावधीत शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकांचा निकाल लागू शकतो.

Share This News

Related Post

गुजरातेत भाजपच्या तिकिटावर विजयाची हॅटट्रिक साधणारी महाराष्ट्रातील खान्देशी कन्या आहे तरी कोण ?

Posted by - December 9, 2022 0
गुजरात : महाराष्ट्राच्या खान्देशातील माहेर असलेल्या एक महिला उमेदवार गुजरात विधानसभेच्या तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आणि जिंकल्यासुद्धा ! भाजपच्या या…
Santosh Bangar

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Posted by - February 10, 2024 0
हिंगोली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कायमच…

रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची गुडलक चौकात निदर्शने

Posted by - November 26, 2022 0
पुणे : कथीत योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथे…

BIG BREAKING : पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक; महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्याचे पडसाद

Posted by - December 10, 2022 0
पिंपरी : पिंपरीतून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. पैठणमध्ये एका सभेमध्ये पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अपमानजनक…
Jalgaon News

Jalgaon News : ड्युटीवरून परतलेल्या वन कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Posted by - October 11, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुक्ताईनगर येथे वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *