Shiv Sena MLA Disqualification

Shiv Sena MLA Disqualification : आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नेमकी कशी पार पडणार?

615 0

मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत (Shiv Sena MLA Disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी होत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहे. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये अपात्रता प्रकरणाची सुनावणी होत आहे. विधीमंडळातील सुनावणीत अ‍ॅड. असीम सरोदे ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. तर शिंदे गटासाठी निहाल ठाकरे बाजू मांडतील.

सुनावणी कक्षात कशी असेल सुनावणी?
सुनावणी ठिकाणी आसन क्रमांक 7 ते 11 दरम्यान सर्व जण बसतील
वकील आणि वादी प्रतिवादी हे सुनावणी वेळी पुढे येऊन बाजू मांडतील
अनुक्रमणिकानुसार याचिकाकर्त्यांना बोलावलं जाईल
वकीलामार्फत ज्यांना बाजू मांडायची आहे त्यांना अधिकार पत्र सादर करावे लागेल
भविष्यातील समन्वयासाठी वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअ‍ॅप नंबर द्यावा लागेल जेणेकरुन पुढील माहिती त्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पुरवली जाईल
सुनावणी कक्षात फक्त वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना परवानगी असेल
इतर कर्मचारी व वकिलांना विनापरवानगी प्रवेश मिळणार नाही
मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिर डिव्हाईस सायलेंटवर ठेवावेत
कुणालाही रेकॉर्डिंग करण्यास परवानगी नसेल जर कुणी रेकॉर्डिंग केल्यास कारवाई होईल
गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल.

सुनावणीला उपस्थित असलेले दोन्ही गटाचे आमदार
शिंदे गट
यामिनी जाधव
भरत गोगावले
बालाजी किणीकर
रमेश बोरणारे
बालाजी कल्याणकार
संजय शिरसाठ
संजय रायमूळकर
सदा सरवणकर
महेंद्र थोरवे
महेंद्र दळवी
शांताराम मोरे
किशोर अप्पा पाटील
प्रदीप जैस्वाल
विश्वनाथ भोईर
ज्ञानराज चौगुले
दिलीप लांडे
योगेश कदम
प्रकाश सुर्वे
सुहास कांदे

अपक्ष
नरेंद्र बोंडेकर

ठाकरे गट
सुनील प्रभू
सुनील राऊत
राहुल पाटील
अजय चौधरी
संजय पोतनीस
रवींद्र वायकर
वैभव नाईक
नितीन देशमुख
भास्कर जाधव
रमेश कोरगावकर
उदयसिंह राजपूत
प्रकाश फातर्फेकर
राजन साळवी
कैलास पाटील

Share This News

Related Post

Arvind Kejriwal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

Posted by - June 20, 2024 0
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला असून उद्या अरविंद केजरीवाल हे तिहार जेलमधून बाहेर…

महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे ; महाविकास आघाडीचं संयुक्त निवेदन

Posted by - January 31, 2022 0
राज्यात निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त निवेदन काढत महा विकास आघाडीचे…
Aurangabad News

Aurangabad News : धक्कादायक ! ‘ताई, मला माफ कर’ रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने बहिणीच्याच घरात घेतला गळफास

Posted by - August 31, 2023 0
औरंगाबाद : देशभरात बुधवारी (30 ऑगस्ट) बहीण-भावाचा सण म्हणजेच रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे केले जात असताना औरंगाबादमध्ये (Aurangabad News)…

संतापजनक ! दोन अल्पवयीन मुलांचे चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमधील घटना

Posted by - February 21, 2022 0
औरंगाबाद- खाऊ देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलांनी एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. दोन अल्पवयीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *