Datta Dalvi

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

492 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणे ठाकरे गटाच्या नेत्याला (Datta Dalvi Arrested) चांगलेच भोवलं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. विक्रोळीतील राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत, आमदार सुनील राऊत, कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी भांडूप पोलिस ठाण्यासमोर जमले आहेत. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते दत्ता दळवी?
आज मिंधे गट आहे हे आपल्याला सगळ्यानां माहिती आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. पण मला वाटत आज कदाचित दिघे साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदेला चाबकाने फोडून काढलं असतं. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ बिंदे कुठे काय करत होता हे आम्ही स्वत: बघितलेले आहे. समजलं का? मी स्वत: बघितलेले आहे. परंतु बाळसाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली. नाव बाळासाहेबांचेच वापरायचे. हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे XXXच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

IND vs AUS T20 : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका? महत्वपूर्ण सामन्यापूर्वी निम्मा संघच बदलला

Share This News

Related Post

Nagpur News

Nagpur News : टीव्हीवर कार्टून पाहत असताना मोठा अनर्थ घडला अन् चिमुकल्याने जागीच जीव सोडला

Posted by - August 9, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये टीव्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात सेट टॉप बॉक्सला…

किमतीचे लेबल लावून तरुणींचे फोटो शेअर करणाऱ्या विकृत तरुणाला अटक

Posted by - February 12, 2022 0
मुंबई- सोशल मीडियावर किमतीचे लेबल लावून कॉल गर्ल्स असा उल्लेख करत तरुणींचे फोटो शेअर करणाऱ्या विकृत तरुणाला अँटॉप हिल पोलिसांनी…
Sanjay Shirsat

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Posted by - November 25, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : ‘31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार नाही तर 31 डिसेंबर काहीही घडणार नाही, तुम्ही वाट बघा, पण आमच्याकडे कोण…
Devendra-Fadnavis-Raj-Thackeray-Eknath-Shinde-2

युतीचा फॉर्म्युला ठरला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल

Posted by - May 31, 2023 0
मुंबई : मुंबईमधून (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नाही ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022 0
पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *