Bhausaheb Andhalkar

Loksabha : शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला वंचित कडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर

354 0

धाराशिव : लोकसभा निवडणुकींच्या (Loksabha) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग मिळाला असून धारशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने ओमराजे निंबाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर दुसरीकडे महायुतीने अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मात्र, अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्तकरण्यात आली. कोणत्याही शिवसैनिकाला तिकीट द्यावे अशी भूमिका घेऊन देखील त्यांनी घेतली. मात्र तरीदेखील अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाऊसाहेब आंधळकर कोण आहेत?
भाऊसाहेब आंधळकर हे वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव मधील लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. भाऊसाहेब आंधळकर हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवासी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नोकरी सोडून त्यांनी 2011 साली त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडीनंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आक्रमक नेता आणि पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. माजी विधानसभा सभापती वसंत डावखरे यांच्यासोबतचा त्यांचा वाद जोरदार गाजला होता. आंधळकर यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आणि त्यासोबतच आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात देखील त्यांचे नाव समोर आले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

Share This News

Related Post

‘ या ‘ कारणासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट ; 1 तासाच्या चर्चेनंतर …

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अद्याप देखील संपला नाहीये. प्रत्येक पक्ष सध्या एकमेकांवर शाब्दिक टीकाटिप्पणीसह अगदी धक्काबुक्कीवर देखील येत आहेत.…

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये भाजप-शिंदे गटाने उधळला गुलाल; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खाते देखील उघडले नाही

Posted by - December 20, 2022 0
कल्याण : कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचे होतं कारण, आतापर्यंत या दोन्ही…
Maharashtra Political Crisis

Ajit Pawar : अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मिळणार 11 खाती? संभाव्य यादी आली समोर

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह त्यांच्या एकूण…
Kalubai Temple

Kalubai Temple : काळूबाईचे मंदिर ‘या’ कारणामुळे 5 दिवस राहणार बंद

Posted by - January 6, 2024 0
सातारा : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीचे (Kalubai Temple) मंदिर…

मी मर्द शिवसैनिक ; देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांचे प्रतिउत्तर

Posted by - March 13, 2022 0
मी तर खुलेपणाने चौकशीला तयार असल्याची घोषणा केली होती. कुठेही बोलवा, मी बोलवायला तयार आहे. पण संजय राऊत मात्र पत्रकार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *