Shirur Lok Sabha

Shirur Lok Sabha : राष्ट्रवादी Vs राष्ट्रवादीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? शिरूर लोकसभेत दोन्ही पवारांची ताकत पणाला लागणार

398 0

पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश (Shirur Lok Sabha) केला. त्यांच्या या प्रवेशामुळे महाविकास आघाडीची आणि अर्थात शरद पवारांची गणित बिघडणार का ? आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत त्यामुळे अमोल कोल्हे यांना या ठिकाणी गड राखणं अवघड जाईल का ? तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या या लढतीची समीकरण नेमकी कशी असतील पाहूया….

आढळराव पाटील यांनी 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर 2009 आणि 2014 ला ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र 2019 ला राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव आढळरावांच्या चांगलाच जीव्हारी लागला. पुढे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर आढळराव पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेबरोबर गेले. तर मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्याला अजित पवार हे महायुतीत सामील होण्याच्या आधीच शिरूर मध्ये काम करण्यास सांगितलं होतं. शिरूरची जागा आपल्याला पुन्हा जिंकायची आहे. असं खुद्द मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यामुळेच मी सातत्याने शिरूर मध्ये काम करत राहिलो. मात्र आता ही जागा अजित पवार गटाकडे गेल्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांच्या सहमतीने मी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतोय, असं आढळराव पाटील म्हणाले. त्याचबरोबर मी पुन्हा राष्ट्रवादीत येतोय याचा अर्थ घरवापसी असा नसून माझ्या हातावर कायमच शिवबंधन असेल, असं देखील ते म्हणाले. आधी राष्ट्रवादीत असलेले आढळराव पाटील नंतर शिवसेनेत आले तर दुसरीकडे आधी शिवसेनेत असलेले डॉ. अमोल कोल्हे 2019 साली राष्ट्रवादीत आले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेत काही काळ एकत्र काम केलेलं आहे. पण आता राष्ट्रवादीत असलेल्या अमोल कोल्हेंना नाटकाच्या माध्यमातून शिवशाही दाखवून मतं मिळवण्याची परिस्थिती आता राहिलेली नाही. असा टोला आढळराव पाटील यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी मीच दिली, त्यानंतर ते निवडून आले. पण आगामी निवडणुकीत कोल्हे यांचा पराभव निश्चित असल्याचा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला आहे.अमोल कोल्हे हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विश्वासू नेते आहेत. त्यामुळे ते हमखास निवडून येतील असा विश्वास शरद पवार गटाला आहे. त्यातच शिवाजी आढळराव पाटील यांना काही दिवसांपूर्वी म्हाडाचे अध्यक्ष पद देण्यात आलं. ज्यामुळे त्यांचा खासदारकीचा पत्ता कट होणार असल्यामुळे त्यांचं पुनर्वसन म्हाडाचं अध्यक्ष पद देऊन केल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या तोडीचा उमेदवार शिरूर मध्ये नसल्यामुळे ही जागा सहज शरद पवार गटाच्या पारड्यात पडेल, अशी शक्यता होती. परंतु या सर्व शक्यता आता फेल झाल्या आहेत.

कोणाचे पारडे जड ?
शिरूर मध्ये अजित पवारांची मोठी ताकद आहे. हडपसर चे आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते आणि अतुल बेनके हे सर्व अजित पवार गटात आहेत. तर शरद पवार यांच्याकडे केवळ आमदार अशोक पवार आहेत. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश केलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार सर्व ताकद पणाला लावतील. ज्यामुळे डॉ. अमोल कोल्हे आणि अर्थात शरद पवार यांना शिरूर लोकसभा निवडणूक ही जड जाणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढतीत बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : खळबळजनक ! नातेवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्याने पुण्यात तरुणाची हत्या

Congress News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याने सोडला हात

Ajit Pawar : अजित पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, पुण्यामध्ये केली मोठी घोषणा

Punit Balan : ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धे’त ‘पुनीत बालन ग्रुप’च्या आरती पाटीलने पटकावली 2 कांस्य पदके

Shivaji Adhalrao Patil : घड्याळ हातात मात्र शिवबंधन कायम राहणार; राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजी आढळरावांचं मोठं वक्तव्य

Pune News : ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान

Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती

Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा

Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Phalakasana : फलकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

संजय राऊतांवरील कारवाईचं मूळ ‘म्हाडा’च्या त्या एका तक्रारीत

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत ईडीनं गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.   मात्र संजय राऊत…

CRIME NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ; आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल

Posted by - November 14, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्वर…
Pune News

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Posted by - January 30, 2024 0
पुणे : विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे तिसरे पर्व येणे आवश्यक आहे. पुणे शहर (Pune News)…

“तुमची हिम्मत कशी झाली माझा फोन रेकॉर्ड करण्याची…” खासदार नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा ; पहा व्हिडिओ

Posted by - September 7, 2022 0
अमरावती : खासदार नवनीत राणा आज अमरावतीच्या पोलिसांवर चांगल्याच कडाडल्या आहेत. विषय होता लव्ह जिहाद प्रकरणातून एका मुलीचं झालेलं अपहरण…
Dagdushet Ganpati

Dagdushet Ganapati : ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारण्यात येणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

Posted by - June 21, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganapati), सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *