Shirur Lok Sabha

Shirur Lok Sabha : शिरूर मतदार संघात होणार तिरंगी लढत!

377 0

पुणे : बारामती सोबतच शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांनी शिवसेनेकडून आयात करून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघाची लढत दुरंगी वाटत असतानाच आता या मतदारसंघातून वंचितने आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

कोण ठरला वंचितचा उमेदवार?
राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष असा प्रवास करत आलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना वंचित कडून शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्यामुळे आता या मतदारसंघात डॉ. कोल्हे – आढळराव पाटील- बांदल अशी तिरंगी लढत होणार आहे. मंगलदास बांदल हे अपक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विधानसभेच्या निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना देखील त्यांचे तिकीट कापण्यात आल्यामुळे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात आंबेगाव तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवली मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

खंडणी सोबतच फसवणुकीच्या गुन्ह्यात मंगलदास बांदल यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास झाला होता. रांजणगाव ‘एमआयडीसी’मधून खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणा मध्ये बांदल यांना मे 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. नुकतेच जामिनावर तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न देखील केला होता.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्यामुळे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या वेळी आणि उमेदवारी जाहीर करताना मंगलदास बांदल यांनी उपस्थिती दर्शवल्या नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांची भेट देखील घेतली होती. अखेर बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिरूरमध्ये जोरदार तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Karan Pawar : चर्चेतील चेहरा : करण पवार

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

Amit Thackeray : ‘…हे भान सरकारला यावे’,अमित ठाकरेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Hatkanangale Loksabha : आढावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा

Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Nana Patole

Leader of the Opposition : ‘या’ कारणामुळे विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीला विलंब; नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

Posted by - July 22, 2023 0
नागपूर : राज्यात पावसाळी अधिवेशनला सुरू होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. तरीदेखील अजूनपर्यंत विरोधी पक्षनेत्याची निवड (Leader of the…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना

Posted by - May 21, 2024 0
पुणे : पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

Posted by - March 4, 2022 0
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि नवाब मलिक यांचा राजीनामा हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे तर…
ramesh jadhav

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार

Posted by - May 6, 2024 0
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला होता. ठाकरे गटाकडून माजी महापौर रमेश जाधव यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *