Eknath, Ajit, Devendra

TOP NEWS MARATHI POLITICAL SPECIAL : खातेवाटपाचा तिढा कायम; ‘या’ कारणांमुळे रखडले आहे खातेवाटप

654 0

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत सरकारमध्ये सामील होण्याचा घेतला राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली नवनिर्वाचित मंत्र्यांना दालन मिळालं शासकीय बंगल्यांचा वाटप झाला मात्र अजूनही खाते वाटप झालं नाही नेमकं खातेवाटप का रखडलं आहे? चला जाणून घेऊयात…

30 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 9 ऑगस्ट 2022 रोजी राज्य मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या 9 आणि भाजपाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता 2 जुलैला अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत थेट सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराजबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन 1 महिना उलटला तरी या मंत्र्यांना अद्याप कोणतंही खातं मिळालेले नाही.

खातेवाटप का रखडले?
उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थमंत्री पद देण्यास शिदेंच्या शिवसेनेचा विरोध
सध्या अर्थ खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे.
अजित पवारांसह शपथ घेतलेले मंत्री जेष्ठ आणि अनुभवी असून त्यांना जेष्ठतेनुसार खाती मिळावीत अशी अजित पवारांची मागणी आहे
चांगल्या खात्यांसाठी अजित पवार आग्रही आहे
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना भाजपाच्या कोट्यातून मंत्रीपद द्यायचं की शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद द्यायचं यावरून पेच निर्माण झाला आहे
अजित पवारांना महसूल खातं मिळेल अशी चर्चा मात्र जर अजित पवारांकडे महसूल खाते दिले तर विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोणता मंत्रिपद द्यायचं यावरून देखील पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान खाते वाटपाचा तिढा न सुटल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिल्ली दौरा करत गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अजित पवारांच्या अमित शहांबरोबरच्या भेटीनंतर आता मंत्र्यांना खातेवाटप केव्हा होणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Share This News

Related Post

Disha Salian Case

Disha Salian Case : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन; ‘हा’ अधिकारी करणार टीमचे नेतृत्व

Posted by - December 12, 2023 0
मुंबई : दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

लाल परीची दिवाळी जोरदार ! 275 कोटींचे उत्पन्न

Posted by - November 3, 2022 0
महाराष्ट्र : कोरोना काळामध्ये सर्वच क्षेत्रांना जबरदस्त आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे लाल परीला देखील याचा मोठा फटका बसला. पण…
Gadchiroli Election

Gadchiroli Election : निवडणुकीसाठी तैनात जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 20, 2024 0
गडचिरोली : गडचिरोलीमधून एक धक्कादायक घटना (Gadchiroli Election) समोर आली आहे. देशभरामध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान शनिवारी पार पडलं, यात महाराष्ट्रातल्या…

मुंबई : तुम्हीही लग्नाचा वाढदिवस विसरता का ? ही बातमी वाचा, लग्नाच्या वाढदिवस विसरला म्हणून नवरा बायको मध्ये रप्पाधप्पी

Posted by - February 24, 2023 0
मुंबई : ऐकावं तेवढं नवलच अशी एक घटना घडली आहे. आत्तापर्यंत लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून नवरा बायको मध्ये भांडण, नाराजी…
Aurangabad Crime

Aurangabad Crime : औरंगाबाद हादरलं ! गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने स्वतःच्याच लेकराचा घेतला जीव

Posted by - August 28, 2023 0
औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Crime) जिल्ह्यातील गंगापूर शहरात मन सुन्न करुन टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Aurangabad Crime) खासगी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *